LPG Gas Cylinder  Dainik Gomantak
अर्थविश्व

1st December 2022: 1 डिसेंबरपासून रेल्वे, बँक अन् LPG सह सर्व नियमांमध्ये होणार मोठा बदल!

Changes From 1st December 2022: गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ट्रेनच्या वेळापत्रकात अनेक मोठे बदल होणार आहेत, जाणून घेऊया...

दैनिक गोमन्तक

New Rules From 1st December 2022: वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर (1 डिसेंबर 2022) सुरु होणार आहे... या महिन्यातही अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ट्रेनच्या वेळापत्रकात अनेक मोठे बदल होणार आहेत. जाणून घेऊया...

जीवन प्रमाणपत्र सादर करा

पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ते सबमिट करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे, त्यामुळे तुमचे प्रमाणपत्र त्वरित सबमिट करण्यासाठी तुमच्याकडे अजून दोन दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही तुमचे प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमचे पेन्शनही (Pension) थांबू शकते.

गाड्यांच्या वेळेत बदल होणार

याशिवाय, डिसेंबर महिन्यात थंडी आणि धुके वाढल्याने अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याशिवाय डझनभर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नियोजन करुन प्रवास करावा.

गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार

याशिवाय, सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या किमतीतही मोठा बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल कंपन्या दरांचा आढावा घेतात, ज्यात वाढ झाल्याने तुमच्या खिशावर परिणाम होतो. यासोबतच गॅस सिलिंडरच्या नवीन किमतीही जाहीर करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली होती.

बँकांनाही 13 दिवस सुट्टी असेल

तसेच, डिसेंबर महिन्यात बँकाही 13 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये राज्यासह अनेक सुट्ट्यांचा समावेश आहे. ख्रिसमस, वर्षाच्या शेवटच्या दिवसासह अनेक सुट्टया आहेत, ज्या दिवशी बँका बंद राहतील. त्यामुळे अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी पूर्ण नियोजन करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT