LIC's Dhan Varsha Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC's Dhan Varsha: रिस्क कव्हर आणि बचतही; एलआयसीची नवी पॉलिसी आहे खास

पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) वेळोवेळी नवीन पॉलिसी जाहीर करत असते. देशातील अनेकजण गुंतवणूकीसाठी एलआयसीला पहिली पसंती देतात. एलआयसीने नुकतीच एक नवीन पॉलिसी लाँच केली आहे. या पॉलिसीत तुम्ही बचतीसह, भविष्यातील रिस्क देखील कव्हर करू शकता. धन वर्षा असे एलआयसीच्या या नवीन पॉलिसीचे नाव आहे.

काय आहे धन वर्षा पॉलिसी?

धन वर्षा पॉलिसीत, जर पॉलिसी धारकाचा मुदतपूर्तीच्या अगोदर मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसोबत दुप्पट एकरकमी पेमेंट दिले जाते. धन वर्षा पॉलिसी सिंगल प्रीमियम जीवन विमा, सहभागी बचत योजना जीवन विमा आणि नॉन लिंक्ड योजना आहे. यामध्ये, कंपनीकडून पॉलिसी मुदतपूर्तीच्या दिवसापासून गॅरंटी लोन पेमेंट ऑफर केले जाते. यात तुमची रिस्क कव्हर केली जाईल तसेच बचत देखील होईल.

पॉलिसी ऑनलाइन उपलब्ध नाही

धन वर्षा पॉलिसी सध्या ऑनलाइन उपलब्ध नाही. पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. या पॉलिसीत किमान विमा रक्कम 1.25 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कमाल मर्यादा नाही.

पॉलिसी दोन टर्ममध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. पहिली दहा वर्षे आणि दुसरी 15 वर्षे. दोन्ही पॉलिसीसाठी पात्रता वेगळी ठेवण्यात आली आहे. दहा वर्षांच्या पॉलिसीसाठी धारकाचे किमान वय 8 वर्षे असावे. तर, 15 वर्षांच्या पॉलिसीसाठी, किमान वय 3 वर्षे असावे. पहिल्या पर्यायामध्ये, नॉमिनीला 1.25 पट कर्ज लाभ तसेच हमी अतिरिक्त बोनस मिळेल. दुसऱ्या पर्यायात, हमी अतिरिक्त बोनससह प्रीमियमच्या 10 पट कर्जाचा लाभ मिळेल.

या पॉलिसीची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला कर्ज आणि सरेंडरची सुविधाही दिली जात आहे. तसेच, मुदत संपल्यानंतर नॉमिनीला एकरकमी किंवा पेन्शन स्वरूपात घेता येऊ शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT