New Jobs In Customer Services Company: कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली जगत होते, परंतु यातही एक चांगली गोष्ट अशी घडली ती म्हणजे, लोकांना घरातून काम करण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला. कंपन्यांनी सुरुवातीला सक्तीने ही प्रणाली अंगीकारली होती, पण आता त्याचे फायदे पाहून तेही याला कामाचा स्वाभाविक भाग बनवत आहेत. आता एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने भारतात 9 हजार नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निवडलेल्या कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
देशाच्या विविध भागातून नोकरभरती केली जाईल
ग्लोबल कस्टमर सर्व्हिस सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीने मंगळवारी जाहीर केले की, आम्ही 2022-2023 या आर्थिक वर्षात 9 हजार नवीन कर्मचारी भरती करणार आहोत. कंपनी आगामी काळात देशाच्या विविध भागातून या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या कर्मचाऱ्यांना (Employees) घरुन म्हणजेच कुठूनही काम करण्याची सुविधा दिली जाईल. कंपनीच्या घोषणेनुसार या कर्मचाऱ्यांना फोन आणि चॅटद्वारे कामावर घेतले जात आहे. भरती केलेले कर्मचारी आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सेवा देण्याच्या सेवेत गुंतले जातील.
भारतात संघटित टॅलेंट आहे
कंपनीच्या भारत आणि अमेरिका (America) क्षेत्राच्या वरिष्ठ उपाध्यक्षा नीना नायर म्हणतात की, भारतात (India) मोठ्याप्रमाणात संघटित टॅलेंट आहे, ज्यामुळे भारत या क्षेत्रात आघाडीवर आहे. कंपनीद्वारे नवीन तरुणांची भरती केली जाणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी 5 हजार तरुणांना नोकरी दिली होती. नंतर त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्टिकल एक्सपर्टाईज आणि क्लायंट सर्व्हिसेसचे प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्यामुळे ते आज त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे.
कंपनीला हा पुरस्कार मिळाला
नीना नायर पुढे सांगतात की, चांगल्या ग्राहक सेवेसाठी कंपनीला अलीकडेच 'बीपीओ ऑफ द इयर' चा किताबही मिळाला आहे. अमेरिकेतील लास वेगास येथे आयोजित एका कस्टमर इव्हेंटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगातील या सर्वात मोठ्या कस्टमर इव्हेंटमध्ये जगभरातील कंपन्या सहभागी होतात आणि त्यांची उत्पादने प्रदर्शित करतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.