Netflix Offline Dainik Gomantak
अर्थविश्व

Netflix यूजर्संना आता आणखी एका खास फिचर्सला म्हणावं लागणार अलविदा; मिळणार नाही ‘ही’ सुविधा

Netflix Offline: नेटफ्लिक्सचा सर्वाधिक वापर जगभरात चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यासाठी केला जातो. हे एक अतिशय लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.

Manish Jadhav

Netflix Offline: नेटफ्लिक्सचा सर्वाधिक वापर जगभरात चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यासाठी केला जातो. हे एक अतिशय लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. तथापि, कंपनीने उचललेल्या काही कठोर पावलांमुळे यूजर्सची नक्कीच निराशा झाली आहे. नेटफ्लिक्सने आधीच पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली आहे. आता यूजर्संना आणखी एका खास फिचर्सला अलविदा म्हणायला तयार राहावे लागेल.

दरम्यान, Netflix आपले Windows 11 आणि Windows 10 ॲप्स बंद करणार आहे. त्याऐवजी, वेब ॲप लॉन्च केले जाऊ शकते. पण सर्वात मोठा धक्का म्हणजे तुम्हाला विंडोजवर डाउनलोड/ऑफलाइन सुविधा मिळणार नाही. नेटफ्लिक्सच्या अपकमिंग विंडोज ॲपमध्ये आणखी सुधारणा केली जाईल. पण यामध्ये कंपनीकडून ऑफलाइन व्ह्यू फीचर उपलब्ध होणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लोकप्रिय फीचर अपकमिंग विंडोज ॲपमधून काढून टाकले जाईल. त्यामुळे तुम्ही चित्रपट किंवा वेब सीरिज डाउनलोड करुन ऑफलाइन पाहू शकणार नाही. सध्याच्या ॲपमध्ये तुम्हाला डाउनलोड करण्याची संधी मिळते.

नेटफ्लिक्सवर डाउनलोड पर्याय उपलब्ध होणार नाही

Windows 11 आणि Windows 10 च्या विद्यमान ॲप्समध्ये, यूजर्स त्यांच्या आवडत्या सामग्री 1080p फुल HD मध्ये डाउनलोड करु शकतात. तथापि, नवीन अपडेट अंतर्गत नवीन ॲप्स डाउनलोड करण्यासाठी कोणताही सपोर्ट नसेल. पण तुम्ही मोबाईलवर टीव्ही शो आणि चित्रपट ऑफलाइन पाहू शकाल. याचा अर्थ आता नेटफ्लिक्सचे शो फक्त मोबाईल आणि टॅब्लेटवर ऑफलाइन चालतील.

नेटफ्लिक्स स्वस्त प्लॅन आणणार

विंडोजसाठी नेटफ्लिक्सच्या अपडेटेड ॲपमध्ये ॲड-सपोर्ट फीचर देखील येईल. याद्वारे लोकांना नेटफ्लिक्सवर जाहिराती दिसतील. त्याचा मोठा फायदा म्हणजे नेटफ्लिक्स तुम्हाला खूप कमी दरात चित्रपट आणि शो पाहण्याची संधी देईल. बहुतेक टीव्ही शो आणि चित्रपट पाहताना व्यावसायिक जाहिराती दिसतील. याशिवाय, लाइसेन्सिंगमुळे काही शो नेटफ्लिक्सवर बघायला मिळणार नाहीत.

Netflix चे अपडेटेड ॲप कधी येईल?

Netflix ची भारतात ॲड-सपोर्टेड प्लान नाहीये. त्यामुळे, जर तुम्हाला ऑफलाइन शो पाहायचे असतील तर तुम्ही ते फक्त मोबाइलवर पाहू शकता. नेटफ्लिक्सच्या विंडोज ॲपसाठी अपडेट कधी येणार हे सध्या स्पष्ट नाही. ज्यांनी मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर ऑटो-अपडेट केले आहे त्यांच्यासाठी, नेटफ्लिक्स ॲप नवीन व्हर्जन रिलीज होताच आपोआप डाउनलोड होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT