Narendra Singh Tomar Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत.

दैनिक गोमन्तक

Narendra Singh Tomar: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना थेट मिळत आहे. यातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi). याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देण्याची तरतूद आहे. लहान शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यावर भर देताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, 'सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.'

पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या

FICCI शाश्वत कृषी परिषद आणि पुरस्कार कार्यक्रमाला संबोधित करताना तोमर म्हणाले की, 'भारत हा कृषीप्रधान देश आहे. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्राला बळकटी देणे हे सरकार आणि जनतेचे कर्तव्य आहे. सरकारने (Government) गेल्या आठ वर्षांत कृषी क्षेत्रासंबंधी महत्त्वाचे बदल केले आहेत. कृषी पिकांची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.'

10000 शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्याचे काम सुरु आहे

यावेळी ते म्हणाले की, 'शेतीवरील खर्च कमी करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एकूण शेतकऱ्यांपैकी 86 टक्के अल्पभूधारक शेतकरी (Farmer) आहेत. त्यांची स्थिती सुधारण्याची गरज आहे. लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार 10,000 शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) स्थापन करत आहे. विशेष म्हणजे, सरकारने 1 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा निधीचीही घोषणा केली आहे.'

याशिवाय, पशुपालन क्षेत्रासाठी प्रचंड केंद्रीय खर्चाच्या नवीन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणण्यावरही सरकार भर देत असल्याचेही तोमर म्हणाले. कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मंत्रालयाने आधीच मानक कार्यप्रणाली जारी केली आहे.

तसेच, कृषी क्षेत्रात रसायनांचा वापर कमी व्हावा यासाठी सरकार सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न करत आहे. शेवटी तोमर म्हणाले की, 'गेल्या आठ वर्षात सरकारने भारतीय शेती फायदेशीर करण्यासाठी केलेल्या सुधारणांमुळे तरुणाई आता शेतीकडे आकर्षित होत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT