Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

Small Savings Scheme: सर्वसामान्यांना नववर्षाची भेट, अल्पबचत योजनांच्या व्याजदरात सरकारने केली भरघोस वाढ

दैनिक गोमन्तक

Investment Schemes: नरेंद्र मोदी सरकारने नवीन वर्ष 2023 पूर्वी सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने 1 जानेवारीपासून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस मुदत ठेव, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी व्याजदरात ही वाढ करण्यात आली आहे. 1-वर्ष बचत योजनेवरील व्याजदर 6.6% पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो पूर्वी 5.5% होता. तर 2 वर्षांच्या योजनेवर 6.8% दराने व्याज मिळेल, जे आधी 5.7% होते. 3 वर्षांच्या योजनेवरील व्याजदर 6.9% पर्यंत वाढला आहे, जो पूर्वी 5.8% होता.

त्याचवेळी, 5 वर्षांच्या योजनेवर 7% दराने व्याज दिले जाईल, जे आधी 6.7 टक्के होते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर आता 8% झाला आहे, जो पूर्वी 7.6% होता. मासिक उत्पन्न योजनेवरील व्याज दर 7.1% पर्यंत वाढला आहे, जो पूर्वी 6.7% होता. याशिवाय किसान विकास पत्रावर आता 7.2 टक्के दराने व्याज मिळेल.

तसेच, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर (Interest Rate) वाढवून 7% करण्यात आला आहे, जो पूर्वी 6.8% होता. वित्त मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी एक परिपत्रक जारी केले, ज्यात असे म्हटले आहे की, या लहान बचत योजनांवरील व्याजदर जानेवारी-मार्च 2023 तिमाहीसाठी 110 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढवले ​​आहेत.

लहान बचत योजनांवर व्याजदर कसा ठरवला जातो?

सरकार दर तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेते. श्यामला गोपीनाथ समितीने अल्पबचत योजनांचे व्याजदर मोजण्याचे सूत्र दिले होते. समितीने विविध योजनांचे व्याजदर समान मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या उत्पन्नापेक्षा 25-100 bps जास्त असावेत असे सुचवले.

गेल्या वेळी व्याजदर कधी वाढले होते

तब्बल चार वर्षांनंतर सरकारने (Government) गेल्या तिमाहीत काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​होते. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीसाठी तीन लहान बचत योजनांचे व्याजदर 10 bps ते 30 bps पर्यंत वाढवले ​​गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT