Money Dainik Gomantak
अर्थविश्व

84 रुपयांचा शेअरमध्ये करू शकता तुम्ही बंपर कमाई, जाणून घ्या

अवघ्या 15 दिवसांत कमावले 1 लाख, ₹ 2.53 लाख.

दैनिक गोमन्तक

2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी आतिशय चांगले आहे. गेल्या वर्षी मल्टीबॅगर स्टॉक लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉक्सनी प्रवेश केला होता. आता गुंतवणूकदार 2022 मध्ये चांगला परतावा देणारे स्टॉक शोधत आहेत. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल, तर आम्ही तुम्हाला अशा आशादायक स्टॉकबद्दल सांगत आहोत, ज्याने केवळ 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये 153 टक्क्यांहून अधिक (Stock return) परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ

15 दिवसांत 153.43% परतावा दिला

3 जानेवारी 2022 रोजी या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 33.50 रुपये होती. आपण जर टेक्सटाईल स्टॉक - एके स्पिंटेक्स बद्दल विचार केला तर 21 जानेवारी 2022 रोजी त्याचा क्लोजिंग रेट हा 84.90 रुपये होता. म्हणजेच, जानेवारी महिन्याच्या 15 व्या ट्रेडिंग सत्रात, या शेयरघेणाऱ्याने आपल्या भागधारकांना 153.43% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 1 महिन्यात, AK Spintex स्टॉकची किंमत 24.35 रुपये (23 डिसेंबर 2021 बंद किंमत) वरून 84.90 रुपये (21 जानेवारी 2022 बंद किंमत) झाली. 60.55 रुपयांची वाढ झाली. या काळात शेयर भागधारकांना 248.67% परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांसाठी मोठा नफा

जर गुंतवणुकदाराने महिन्याभरापूर्वी कापड स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची आजची रक्कम ही 3.48 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने, 2022 मध्ये ट्रेडिंग च्या पहिल्या दिवशी 3 जानेवारी रोजी 33.50 रुपये असतांना टेक्सटाईल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 2.53 लाख रुपये झाली असती. गेल्या एका आठवड्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock list) सर्व ट्रेडिंग सत्रांमध्ये 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला गेला आहे. या वर्षासाठीव याला संभाव्य मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक मानला जाऊ शकतो.

काय आहे कंपनीचा व्यवसाय ?

ही कंपनी मूळत: "AK Processors Pvt Ltd" या नावाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून सुरू झाली होती. त्याची सुरुवात 6 ऑक्टोबर 1994 रोजी झाली. मानवनिर्मित कापडांवर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने या कंपनीची (Company )सुरुवात करण्यात आली. नंतर 6 जानेवारी 1995 रोजी कंपनीचे पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी रूपांतरित करण्यात आले. ऐंशीच्या दशकात वस्त्रोद्योग क्षेत्रात भरपूर संधी होत्या. सरकारनेवस्त्रोद्योग विकासावर भर दिल्यामुळे. या संधीचा फायदा घेण्यासाठी कंपनीने कापड प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: बॉस पण खूश अन् पाकीट पण फुल! 12 नोव्हेंबरनंतर 'या' 4 राशींचे पालटणार नशीब; मंगळ गोचरमुळे आयुष्याला मिळणार नवा टर्न

Southern Railways Rules: रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी, रील्स लावल्यास होणार कारवाई; दक्षिण रेल्वेचा प्रवाशांना कडक इशारा! नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

Goa Political Reservation: 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण प्रक्रिया पूर्ण करा; अनुसूचित जमातींचा सावंत सरकारला अल्टीमेटम!

Goa Beach: समुद्रकिनाऱ्यांवर औषधांना दाद न देणारे जीवाणू, NIO चा निष्कर्ष; पावसाळ्यात 50 टक्के पाण्याची गुणवत्ता खराब

"हे नक्की काय चाललंय?", भोममधील बागायती जमिनीच्या रुपांतरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सरपंचांना निवेदन देत आंदोलनाचा दिला इशारा!

SCROLL FOR NEXT