Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Mukesh Ambani New Announcement: मुकेश अंबानींचा 700 कोटींचा प्लॅन; इलेक्ट्रिक वाहनांवरून होम डिलिव्हरी...

डिलिव्हरी, कार्गो फ्लीट इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचे सरकारचे लक्ष्य

गोमंतक ऑनलाईन टीम

Mukesh Ambani New Announcement: देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी, सरकारने डिलिव्हरी आणि कार्गो फ्लीट पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारच्या या मिशनमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीही साथ देणार आहेत.

Altgreen Propulsion Labs Pvt Ltd ही कंपनी 700 कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक कार्गो वाहने बनवते, ज्याचा वापर देशभरात माल पोहोचवण्यासाठी केला जातो.

ई-कॉमर्सच्या विस्तारानंतर देशात अशा वाहनांची मागणी वाढली आहे. मुकेश अंबानींचे या कंपनीला आर्थिक पाठबळ आहे.

Altgreen Propulsion या वेळी $350 दशलक्ष (सुमारे 2890 कोटी रुपये) मुल्यांकनाने निधी उभारण्याची योजना करत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, कंपनीचे काही विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे स्टेक विकू शकतात. त्याचवेळी काहीजण त्यांचे शेअरहोल्डिंग वाढवू शकतात.

दरम्यान, कंपनीचे हे नियोजन अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. येत्या काळात निधी उभारणीशी संबंधित तपशिलांमध्ये बदल होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या एका बातमीत, ऑल्टग्रीन प्रोपल्शनचे सीईओ अमिताभ सरन यांनी निधी उभारणीच्या योजनेला दुजोरा दिला आहे.

कंपनी जुलैपर्यंत निधी उभारणीचे काम पूर्ण करू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

ऑल्टग्रीनची स्थापना 2013 मध्ये झाली. ही कंपनी इलेक्ट्रिक कार्गो वाहनांच्या डिझायनिंगपासून ते उत्पादनापर्यंत सर्व काही करते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ते दरवर्षी 55,000 इलेक्ट्रिक 3-व्हीलर मालवाहू वाहनांचे उत्पादन करते.

सेन्स व्हेंचर्स, रिलायन्स ग्रुपची रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, एक्सपोनेंशिया कॅपिटल पार्टनर्स, मोमेंटम व्हेंचर कॅपिटल आणि अ‍ॅक्युरंट इंटरनॅशनल यांनी ए-सिरीज फेरीत कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजने कंपनीत सुमारे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने प्रत्येकी 100 रुपये दर्शनी मूल्याच्या 34,000 अनिवार्य परिवर्तनीय प्राधान्य शेअर्सच्या बदल्यात ही गुंतवणूक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT