Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

मुकेश अंबानींचे ठंडा ठंडा कूल कूल! Cold Drink नंतर आता विकणार 'आइस्क्रीम'

Mukesh Ambani: तेल वायू आणि दूरसंचार व्यवसायानंतर आता देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या उन्हाळ्यात रिटेल क्षेत्रात दहशत निर्माण करण्याची पूर्ण तयारी केली आहे.

Manish Jadhav

Mukesh Ambani: तेल वायू आणि दूरसंचार व्यवसायानंतर आता देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या उन्हाळ्यात रिटेल क्षेत्रात दहशत निर्माण करण्याची पूर्ण तयारी केली आहे.

गेल्या महिन्यात त्यांचा कोल्ड्रिंक ब्रँड कॅम्पा कोला लाँच केल्यानंतर, अंबानी यांनी आता उन्हाळ्यातील आणखी एका हॉट बिजनेसकडे लक्ष वेधले आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज आइस्क्रीम बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची FMCG कंपनी, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स आपल्या इंडिपेंडन्स ब्रँडसह आइस्क्रीम व्यवसायात प्रवेश करु शकते, असे द टाइम्सने वृत्त दिले आहे.

इंडिपेंडेंस ब्रँड कंपनीने गेल्या वर्षी लॉन्‍च केला होता, ज्यात मसाले, खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये आणि पॅकेज फूड या सर्व खाद्यपदार्थांचा समावेश होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स (Reliance) आईस्क्रीम बनवण्याचे काम आउटसोर्स करण्यासाठी गुजरातमधील एका कंपनीशी बोलणी करत आहे.

दुसरीकडे, रिलायन्सने नुकतेच डेअरी क्षेत्रातील दिग्गज आरएस सोढी यांची निवड केली आहे. सोढी यांनी अनेक वर्षे अमूलमध्ये काम केले आहे. या नव्या उपक्रमात सोढी यांची महत्त्वाची भूमिका असू शकते.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारतातील आइस्क्रीमचा व्यवसाय सुमारे 20000 कोटींचा आहे, ज्यामध्ये संघटित क्षेत्राचा वाटा जवळपास निम्मा आहे.

अमूल, वाडीलाल, क्वालिटी वॉल्स या कंपन्या येथील बाजारपेठेत आघाडीवर आहेत. याशिवाय, प्रादेशिक स्तरावर अनेक कंपन्या पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला व्यवसाय करत आहेत.

रिलायन्स या व्यवसायात थेट पाऊल टाकणार नाही

वृत्तपत्रानुसार, रिलायन्स या व्यवसायात थेट पाऊल टाकणार नाही. त्याऐवजी गुजरातमध्ये (Gujarat) बनवलेली मोठी कंपनी विकत घेऊ शकते. या कंपनीसोबत रिलायन्सची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कंपनी या उन्हाळ्यात आपले आईस्क्रीम लाँच करु शकते. कंपनी डेडिकेटेड ग्रॉसरी रिटेल आउटलेट्स Jio Mart द्वारे आइस्क्रीम विकू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT