Mukesh Ambani's Reliance industries  Dainik Gomantak
अर्थविश्व

Bloomberg Billionaires Index: मुकेश अंबानी जगातील 11वे सर्वात श्रीमंत व्यक्ती; ब्लूमबर्गने 'सुपर रिच' लोकांची यादी केली जाहीर

Bloomberg Billionaires Index: ब्लूमबर्गने जगातील 15 लोकांची यादी जारी केली आहे, ज्यांच्याकडे $100 अब्ज (सुमारे 8338 अब्ज रुपये) एवढी संपत्ती आहे.

Manish Jadhav

Bloomberg Billionaires Index: ब्लूमबर्गने जगातील 15 लोकांची यादी जारी केली आहे, ज्यांच्याकडे $100 अब्ज (सुमारे 8338 अब्ज रुपये) एवढी संपत्ती आहे. या यादीत भारतातून फक्त मुकेश अंबानी यांचे नाव आहे. या यादीत ते 11व्या स्थानी आहेत. या यादीत पहिले स्थान फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांचे आहे. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बोजेस आणि एलन मस्क दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत फेसबुकची कंपनी मेटाचा मालक मार्क झुकेरबर्ग यांचाही समावेश आहे.

मुकेश अंबानींकडे किती संपत्ती आहे?

दरम्यान, या यादीनुसार मुकेश अंबानी यांच्याकडे 112.2 अब्ज डॉलर्स (सुमारे 9353 अब्ज रुपये) आहेत. मुकेश अंबानी हे भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा मुकेश अंबानी केवळ दोन अंकांनी मागे आहेत.

बर्नार्ड हा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे

या यादीत फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत. बनार्ड यांची एकूण संपत्ती 215.2 अब्ज डॉलर (सुमारे 18 हजार अब्ज रुपये) आहे. मुकेश अंबानी यांच्या तुलनेत त्यांची संपत्ती जवळपास दुप्पट आहे. बर्नार्ड हे लक्झरी प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लुई व्हिटॉन मोएट हेनेसी (LVMH) चे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. बर्नार्ड यांनी अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे ते या कंपनीत अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. नंतर त्यांनी व्यवसायाच्या दुनियेत प्रवेश केला आणि LVMH सुरु केले.

फोर्ब्सच्या यादीत बर्नार्डही पुढे होते

या वर्षाच्या सुरुवातीला फोर्ब्सने श्रीमंतांची यादीही जाहीर केली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून या यादीत बर्नार्ड यांचे नावही सामील झाले होते. यामध्ये एलन मस्क दुसऱ्या क्रमांकावर होते. मुकेश अंबानीबद्दल बोलायचे झाल्यास, ते 9व्या क्रमांकावर होते.

रिलायन्सने 5 वर्षात रक्कम दुप्पट केली

मुकेश अंबानी स्वतःसोबतच आपल्या गुंतवणूकदारांनाही श्रीमंत करत आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीच्या समभागांनी गेल्या 5 वर्षांत सुमारे 128 टक्के परतावा दिला आहे, म्हणजेच गुंतवलेली रक्कम दुप्पट झाली आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 1 लाख रुपयांना विकत घेतले असते तर तुम्हाला आतापर्यंत 1.28 लाख रुपयांचा फायदा झाला असता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT