MS Dhoni | SBI Brand Ambassador  Dainik Gomantak
अर्थविश्व

MS Dhoni: कॅप्टन कूल बनला या बँकेचा ब्रँड अ‍ॅम्बेसडर; भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक

बँकेने दिली आहेत 6.53 लाख कोटींची गृह कर्जे

Akshay Nirmale

MS Dhoni: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. दिवाळीपूर्वी एसबीआयचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून एमएस धोनी मार्केटिंग आणि जाहिरातींमध्ये भूमिका पार पाडणार आहे.

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, एसबीआयचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून एमएस धोनीचा समावेश करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ते म्हणाले की, धोनीच्या एसबीआयसोबतच्या सहकार्यामुळे आमच्या ब्रँडला नवा अवतार मिळेल.

हा निर्णय एक भागीदारी आहे, आमचा उद्देश विश्वास, सचोटी आणि अतूट समर्पणाने देश आणि आमच्या ग्राहकांची सेवा करण्याची आमची वचनबद्धता मजबूत करणे आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. ही बँक देशातील सर्वात मोठी कर्जदाता आहे.

बँकेने आतापर्यंत 30 लाखाहून अधिक भारतीय कुटुंबांची घर खरेदीची स्वप्ने पूर्ण केली आहेत. बँकेचा गृह कर्ज पोर्टफोलिओ 6.53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

ठेवी

जून 2023 पर्यंत, बँकेच्या ठेवी 45.31 लाख कोटी रुपये आहेत आणि CASA प्रमाण 42.88 टक्के आहे. गृहकर्ज आणि वाहन कर्जामध्ये एसबीआयचा बाजारातील हिस्सा अनुक्रमे 33.4 टक्के आणि 19.5 टक्के आहे.

SBI कडे 22,405 शाखा आणि 65,627 ATMs किंवा ADWM चे सर्वात मोठे नेटवर्क असून 78,370 BC आउटलेट आहेत. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अनुक्रमे 117 दशलक्ष आणि 64 दशलक्ष आहे.

डिजिटल कर्ज

डिजिटल कर्ज देण्याच्या बाबतीत, देशातील या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनी YONO च्या माध्यमातून 5,428 कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. FY 2024 च्या पहिल्या तिमाहीत Facebook आणि Twitter वर फॉलोअर्सच्या संख्येत एसबीआय इतर सर्व बँकांहून आघाडीवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT