Motorola smartphones Dainik Gomantak
अर्थविश्व

मोटोरोला स्मार्टफोनची मार्केटमध्ये दमदार एंट्री, 194MP..

मोटोरोलाच्या नवीन फोनबद्दल काही माहिती लीक झाली आहे

दैनिक गोमन्तक

स्मार्टफोनच्या (Smartphone) दुनियेत थैमान घालण्यासाठी स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला दमदार एंट्री मारण्याच्या तयारीत आहे. मोटोरोला लवकरच 194 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन मार्केट मध्ये आणणार आहे. मोटोरोलाचा नवा फोन 200-मेगापिक्सल कॅमेरासह असेल असे आधी सांगितले जात होते. आता हे निश्चित झाले आहे की नवीन फोन 194MP कॅमेरासह मार्केट मध्ये येईल.

मोटोरोलाच्या नवीन फोनबद्दल काही माहिती लीक झाली आहे. असे बोलले जात आहे की मोटोरोला हा फोन मोटोरोला अँड्रॉइड या नावाने लॉन्च करेल. हा फोन अँड्रॉइड (Android) 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

60 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा

टिपस्टर इव्हान ब्लासने मोटोरोला फ्रंटियरशी संबंधित काही माहिती शेअर केली आहे. माहितीनुसार, मोटोरोलाचा हा फोन 1.5-इंचाच्या 194MP सेन्सरसह मार्केट मध्ये येत आहे. फोनच्या मागील बाजूस 194MP प्राथमिक सेन्सर, 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12MP ट्रिपल कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 60-मेगापिक्सेल कॅमेरा दिलेला आहे.

मोटोरोला Frontier च्या या फोनमध्ये USB Type C चार्जिंग फीचर देखील दिले आहे. फोनमध्ये चार्जिंग जॅकसह आहे.

नवीन फोनची वैशिष्ट्ये (मोटोरोला फ्रंटियर वैशिष्ट्ये)

मोटोरोला Frontier फोनमध्ये 6.67 इंच FHD + वक्र AMOLED डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याला Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत रॅमसाठी सपोर्ट देखील मिळू शकतो. फोनला 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज सपोर्ट दिला जाऊ शकतो.

टेक तज्ञांचे म्हणणे आहे की या मोटोरोला फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट तसेच 125W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT