SBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

चुकून भलत्याच बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत का? Recovery Process जाणून घ्या

तुमचेही कधी चुकून भलत्याच बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Puja Bonkile

आजच्या डिजीटल युगात सर्वत्र पैसे ट्रान्सफर करण्याचा आणि ऑनलाइन व्यवहार करण्याचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. पण यामुळे जिथे लोकांच्या सुविधांमध्ये खूप वाढ झाली आहे, तिथे लोक चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.

मात्र, चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर, आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न असतो की आपले पैसे परत मिळतील की नाही? आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना याबाबत एक सल्ला दिला आहे.तुमच्यासह देखील असे झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • एसबीआयच्या ग्राहकांला करावा लागला समस्येचा सामना

अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका ग्राहकाला अशाच समस्येचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत तक्रार नोंदवली. SBI ला टॅग करत ग्राहकाने लिहिले की TheOfficialSBI मी चुकून माझे पैसे चुकीच्या अकाउंट नंबरवर पाठवले आहेत. हेल्पलाइनने सांगितल्याप्रमाणे मी माझ्या शाखेला सर्व डिटेल दिले आहेत. तरीही माझी शाखा रिवर्सलबाबत कोणतीही माहिती देत ​​नाही.

  • SBI काय म्हणाली

या ट्विटला उत्तर देतांना एसबीआयने म्हटले आहे की, एखाद्या ग्राहकाने चुकीच्या खात्यात पैसे पाठवले असल्यास, होम ब्रांच कोणत्याही दंडाशिवाय इतर बँकांसह फॉलोअप प्रोसेस सुरू करेल. ग्राहकाने चुकीचा लाभार्थी खाते क्रमांक नमूद केल्यास, ग्राहकाची गृह शाखा कोणत्याही आर्थिक दायित्वाशिवाय इतर बँकांशी (Bank) पाठपुरावा प्रक्रिया सुरू करेल. या संदर्भात तुम्हाला शाखेत काही समस्या येत असल्यास, https://crcf.sbi.co.in/ccf या लिंकवर तक्रार नोंदवावी आणि दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या समस्या सांगावी. संबंधित टिम यावर काम करेल.

  • SBI चा सल्ला

SBI ने आपल्या ग्राहकांना सल्ला देताना सांगितले की, आम्ही ग्राहकांना विनंती करतो की डिजिटल व्यवहार करण्यापूर्वी प्रविष्ट केलेली सर्व माहिती योग्यरित्या तपासावी. ग्राहकाकडून काही चूक झाल्यास त्याला बँक जबाबदार राहणार नाही. कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी लाभार्थी खाते क्रमांक आणि IFSC कोड दोनदा तपासणे महत्त्वाचे आहे. यामुळे कोणतेही चुक होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT