LPG Dainik Gomantak
अर्थविश्व

एलपीजीच्या दरात होणार कपात? मोदी सरकार लवकरच घेणार निर्णय

LPG Gas Price: अनेक दिवसांपासून महागाईने त्रस्त असलेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार येत्या काही दिवसांत एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करु शकते.

Manish Jadhav

LPG Gas Price: अनेक दिवसांपासून महागाईने त्रस्त असलेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार येत्या काही दिवसांत एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करु शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकार एलपीजी सिलिंडरवर सबसिडी देण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे अनुदान 100 ते 200 रुपये प्रति सिलेंडर असू शकते. मोदी सरकार लवकरच ही सूट जाहीर करु शकते.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला आगामी निवडणुकांशीही जोडून पाहिले जात आहे. यावर्षी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

2024 च्या सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत महागाई हा मोठा निवडणुकीचा मुद्दा बनू शकतो.

त्याचबरोबर, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींबाबत विरोधकांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. सध्या, देशांतर्गत घरगुती एलपीजी सिलिंडरची (14.2 किलो) किंमत सुमारे 1100 रुपये आहे.

त्यांच्या किमतीत बराच काळ चढ-उतार झालेला नाही. त्याचवेळी, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील दीर्घकाळापासून स्थिर आहेत.

दुसरीकडे, 1 ऑगस्टपासून कमर्शियल सिलिंडरच्या (19 किलो) किमती कायम आहेत. सध्या देशात 19 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 1680 रुपये आहे.

मात्र, दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई आली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही देशात दीर्घकाळापासून स्थिर आहेत.

मार्चपासून सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही

सध्या, देशांतर्गत घरगुती एलपीजी सिलिंडरची (14.2 किलो) किंमत सुमारे 1100 रुपये आहे. दिल्लीत त्याची किंमत 1103 रुपये, मुंबईत (Mumbai) 1102.50 रुपये, चेन्नईमध्ये 1118.50 रुपये आणि कोलकातामध्ये 1129 रुपये आहे.

मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. तर कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत वारंवार चढ-उतार होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT