Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Modi Government ने अर्थसंकल्पापूर्वी दिलेले आश्वासन केले पूर्ण, करोडो कामगारांना दिली 'ही' मोठी भेट

E-Shram Portal: केंद्र सरकारने 2021-2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना अनेक आश्वासने दिली होती, जी सरकारने पूर्णही केली आहेत.

दैनिक गोमन्तक

E-Shram Portal: केंद्र सरकारने 2021-2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना अनेक आश्वासने दिली होती, जी सरकारने पूर्णही केली आहेत. अर्थसंकल्पात, मोदी सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी लोकांपर्यंत ई-लेबरसाठी पोर्टल आणण्याचे आश्वासन दिले होते, जे सरकारने ऑगस्ट 2022 मध्येच पूर्ण केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अशी अनेक आश्वासने दिली होती, ज्यावर सरकार आता आपली प्रगती सांगत आहे.

MyGovIndia ने ट्विट केले आहे

MyGovIndia ने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, पंतप्रधान मोदींनी "सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास" या ई-लेबरच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. देशातील कोट्यवधी मजूर आणि कामगारांचे बळ बनून सरकार (Government) नवीन योजना तयार करत आहे.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-2022 मध्ये दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी ई-लेबर पोर्टल सुरु केले जाईल, असे सांगितले होते.

असंघटित कामगारांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

असंघटित कामगारांशी संबंधित माहिती संकलित करण्यासाठी एक पोर्टल सुरु केले जाईल आणि स्थलांतरित कामगारांसाठी चांगल्या योजना सुरु करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल, असे सरकारने म्हटले होते.

26 ऑगस्ट रोजी हे पोर्टल सुरु करण्यात आले

आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल बोलायचे झाल्यास, ई-लेबर पोर्टल 26 ऑगस्ट 2021 रोजी सुरु करण्यात आले आहे. 26 डिसेंबर 2022 पर्यंत पोर्टलवर 28.49 कोटीहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT