Gas Cylinders  Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2023: गरिबांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर, उज्ज्वला योजनेचे बजेट वाढवणार सरकार!

दैनिक गोमन्तक

Ujjwala Yojana: घरगुती गॅस सिलिंडरची किंमत एक हजार रुपयांच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत या अर्थसंकल्पातून महिलांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लोकांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करत आहे.

चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी सुमारे 5812 कोटींचे बजेट ठेवले होते. याशिवाय, या योजनेंतर्गत वर्षातील 12 सिलिंडरवर 200 रुपये सबसिडीही दिली जाते. अशा स्थितीत सरकार हे अनुदान यापुढेही सुरु ठेवेल, अशी अपेक्षा आहे.

गॅस सिलिंडरवर सबसिडी

केंद्र सरकार उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या 12 गॅस सिलिंडरवर सबसिडी देते. सबसिडी अंतर्गत लोकांना प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर (LPG Cylinder) 200 रुपये दिले जातात. आता सरकार पुढील आर्थिक वर्षासाठीही सबसिडी वाढवू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार ही योजना 100% लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी पुढे जाऊ शकते.

9 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला

गेल्या काही वर्षांत गॅस सिलिंडरच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत गरिबांवर याचा बोजा पडू नये, म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मे 2021 मध्ये 200 रुपयांच्या सबसिडीची घोषणा केली होती. ही योजना एका आर्थिक वर्षात फक्त 12 सिलिंडरसाठी होती. या योजनेचा 9 कोटींहून अधिक लोकांना लाभ झाला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने (Government) 5812 कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे.

उज्ज्वला योजना काय आहे

अर्थ मंत्रालय ही योजना आणखी एका आर्थिक वर्षासाठी वाढवू शकते. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते. यासाठी त्यांना 1,600 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

याशिवाय, मोफत रिफिल आणि स्टोव्ह देण्याची तरतूद आहे. सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली आणि 10 ऑगस्ट 2021 रोजी उज्ज्वला 2.0 आणली. या अंतर्गत, वंचित कुटुंबांनाही गॅस सिलिंडर पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT