PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget: 92 वर्षांनंतर मोदी सरकारने अर्थसंकल्पाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय, ऐकून...

Modi Government: 2014 पासून मोदी सरकारने देशाची सूत्रे हाती घेतली आहेत. आत्तापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत.

दैनिक गोमन्तक

Modi Government: 2014 पासून मोदी सरकारने देशाची सूत्रे हाती घेतली आहेत. आत्तापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. यासोबतच या निर्णयांमध्ये असे अनेक निर्णय आहेत, ज्यांच्या माध्यमातून जुन्या प्रथाही सरकारने मोडीत काढल्या आहेत. असाच एक निर्णय मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात घेतला. हा निर्णय अर्थसंकल्पाबाबत आहे. एक जुनी प्रथा मोदी सरकारने मोडीत काढली. यानंतर देशभरात त्यांचे कौतुकही झाले.

केंद्रीय अर्थसंकल्प

वास्तविक, केंद्र सरकारने (Central Government) सादर केलेला सर्वसाधारण अर्थसंकल्प वेगळा आणि रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता. परंतु मोदी सरकारने 2017 मध्ये अर्थसंकल्पाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यादरम्यान मोदी सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला की, आता सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प वेगळे सादर केले जाणार नाहीत, दोन्ही एकत्र सादर केले जातील.

रेल्वे बजेट

सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget) आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र सादर करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या प्रमुख निर्णयांमध्ये गणला जातो. विशेष म्हणजे 92 वर्षांपासून सुरु असलेली प्रथाही मोदी सरकारने मोडीत काढली. मोदी सरकारचा हा निर्णय ऐकून देशातील जनताही अचंबित झाली होती. 1924 मध्ये ब्रिटीशांच्या माध्यमातून स्वतंत्र रेल्वे बजेट सुरु करण्यात आले होते. तर रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या विलीनीकरणामुळे रेल्वेच्या कार्यात्मक स्वायत्ततेवर परिणाम होत नाही, परंतु भांडवली खर्च वाढण्यास मदत होते.

बजेट

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याची 92 वर्षे जुनी परंपरा मोदी सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोडीत काढली. सन 2017 मध्ये जेटली यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र करुन देशातील पहिला एकत्रित अर्थसंकल्प सादर केला. हा बदल विविध भागधारकांच्या अनेक शिफारशींवर आधारित होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT