Currency News Update: देशभरात नोटाबंदीनंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तुमच्याकडेही 500 किंवा 1000 रुपयांच्या नोटा असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
केंद्र सरकारकडून मोठी बातमी समोर येत आहे. 2016 मध्ये मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या होत्या.
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारने या नोटांवर बंदी घातली होती. आता नोटाबंदीच्या 7 वर्षानंतर मोठ्या नोटाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
ज्या उद्देशाने सरकारने या नोटा बंद केल्या होत्या, तो उद्देशही बऱ्याच अंशी सफल झाला आहे. सध्या बातम्या येत आहेत की, सरकार (Government) पुन्हा एकदा 1000 रुपयांची नोट जारी करु शकते. 20216 मध्ये सरकारने 1000 रुपयांची नोट बंद करुन 2000 रुपयांची नोट जारी केली होती.
नोटाबंदीच्या वेळी लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याचा त्रास सहन करावा लागत होता.
सध्या बाजारात 2000 रुपयांच्या नोटा खूपच कमी दिसत आहेत. देशभरात ₹ 500 च्या नोटा बदलण्यासाठी 500 आणि ₹ 2000 च्या नोटा वापरल्या जात होत्या, परंतु बऱ्याच काळापासून तुम्हाला ₹ 2000 च्या नोटा बाजारात दिसणे बंद झाले आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केली होती. यानंतर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून देशात 500 आणि 1000 रुपयांच्या चलनावर बंदी घालण्यात आली. मात्र, यानंतर लोकांना बँकेतून नोटा बदलून देण्याची परवानगी देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.