Microsoft News Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंक्रीमेंट-प्रमोशन न दिल्याचा आरोप... 'या' कंपनीला मोठा झटका; आता द्यावे लागणार 1 अब्ज!

Microsoft News Updates: प्रकरण शांत करण्यासाठी कंपनीला तब्बल 14 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1 अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले.

Manish Jadhav

सुट्ट्यांबाबत अनेकदा कंपन्या, बॉस आणि कर्मचारी यांच्यात शीतयुद्धासारखी परिस्थिती असते. भारतीय कायदा असो की अमेरिकन कायदा, सर्वांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष तरतुदी आहेत. कौटुंबिक काळजी आणि आजारपणासाठी कामातून रजा घेणे हेही कर्मचाऱ्यांच्या अधिकारांतर्गत येते.

अमेरिकेतील (America) मायक्रोसॉफ्ट कंपनीवर या अधिकारांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरण शांत करण्यासाठी कंपनीला तब्बल 14 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1 अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले.

दरम्यान, आरोग्य किंवा कौटुंबिक काळजी घेण्यासाठी रजा घेतलेल्या कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे दंडित केल्याचा आरोप कंपनीवर आहे. त्यांच्याशी भेदभाव करण्यात आला. कॅलिफोर्निया नागरी हक्क विभागाने 2020 मध्ये कंपनीवर रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी भेदभाव केल्याचा आरोप केला होता. हा भेदभाव त्यांच्या कामाला कमी रेटिंग देणे, त्यांची पदोन्नती आणि पगारवाढीमध्ये अडथळे आणण्याशी संबंधित होते. तपासाच्या आधारे एजन्सीने कंपनीवर हे आरोप केले होते.

महिला आणि दिव्यांगाबाबत अधिक भेदभाव

एजन्सीच्या अहवालात असा दावा करण्यात आला की, 2017 पासून, पालकत्व, अपंगत्व, गर्भधारणा आणि कौटुंबिक काळजीसाठी रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ, पदोन्नती आणि स्टॉक अवॉर्डमध्ये समाविष्ट करण्यापासून वगळण्यात आले. या भेदभावाला बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला आणि दिव्यांगांची संख्या अधिक होती.

आरोप फेटाळले

मायक्रोसॉफ्टने एजन्सीसोबत सेटलमेंटमध्ये कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा दावा फेटाळला. कर्मचाऱ्यांना थेट दिलासा देणे आणि भविष्यात भेदभाव टाळणे हा या कराराचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे. करारानुसार, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या धोरणांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र सल्लागार देखील नियुक्त केला जाईल, जेणेकरुन कंपनीमध्ये अशा गोष्टींवर लक्ष ठेवेल.

किती कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल

या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी, Microsoft सर्व पात्र कर्मचाऱ्यांची भरपाई करेल. मात्र, नेमक्या किती कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. कॅलिफोर्नियातील प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला अंदाजे 1,25,000 रुपये दिले जातील असा अंदाज आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन येथे आहे. त्याचे जगभरात 2,21,000 कर्मचारी (Employees) आहेत आणि कॅलिफोर्नियामध्ये सुमारे 7 हजार लोक काम करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT