Gold Silver Rate Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

MCX Gold Price Hike August 2026: भारतीय वायदा बाजारात आज (5 ऑगस्ट) मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांच्या चढ-उतारानंतर आज सोन्या आणि चांदीच्या दरांनी थेट मोठी झेप घेतली.

Manish Jadhav

MCX Gold Price Hike August 2026: भारतीय वायदा बाजारात आज (5 ऑगस्ट) मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांच्या चढ-उतारानंतर आज सोन्या आणि चांदीच्या दरांनी मोठी झेप घेतली असून, दोन्ही मौल्यवान धातू मोठ्या वाढीसह व्यवहार करत आहेत. MCX वर 5 ऑक्टोबरच्या एक्स्पायरीचे सोने तब्बल 1931 रुपयांच्या (1.34 टक्के) मोठ्या वाढीसह 1,46,230 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पार पोहोचले. वायदा बाजारातील या तेजीमुळे सराफा बाजारातही सोन्याच्या किमती उंचावल्या असून खरेदीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली.

सोन्यापेक्षाही (Gold) अधिक धडाकेबाज तेजी आज चांदीच्या दरात पाहायला मिळत आहे. MCX वर 4 सप्टेंबरची एक्स्पायरी असणाऱ्या चांदीच्या भावात थेट 4,277 रुपयांची (1.93 टक्के) वाढ नोंदवली गेली. या वाढीनंतर चांदीचा दर आता प्रति किलो 2,25,892 रुपयांवर पोहोचला. जागतिक बाजारातील सातत्याने होणारे राजकीय आणि आर्थिक बदल, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली अनिश्चितता आणि मौल्यवान धातूंना असलेली मजबूत सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी, या घटकांमुळे सोन्या-चांदीच्या दरांत ही प्रचंड वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मौल्यवान धातूंच्या दरातील या गगनाला भिडणाऱ्या वाढीचा थेट परिणाम स्थानिक सराफा बाजारांवर आणि परिणामी सामान्य ग्राहकांवर होत आहे. सण-उत्सव किंवा लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या बाबींची दक्षता घेणे आवश्यक आहे. सोने खरेदी करताना नेहमी त्यावर बीआयएस हॉलमार्क असल्याची खात्री करुन घ्यावी, कारण हॉलमार्क हेच सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण मानले जाते. याशिवाय आपल्या शहरातील स्थानिक जीएसटी आणि दागिन्यांवर लागणारे मेकिंग चार्जेस आवर्जून तपासून घ्यावेत, जेणेकरुन खरेदी करताना फसवणूक टळू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जरा तरी लाज बाळगा! पाकिस्तानी क्रिकेटपटूला विचारलं 'Who Are You?' तर म्हणाला, 'I Am Fine'; व्हिडीओ व्हायरल

Ferry Service Problems: दोन जुन्या फेरीबोटी, हजारो प्रवासी अन् अनिश्चित सेवा; सारमानस-टोंक मार्गावर नवी बोट कधी?

House Fire: तेंबेवाड्यात आगीचे तांडव; घर जळून खाक झालेल्या कुटुंबाला सरकारचा मदतीचा हात

Sanjay Gupta Death: बॉलिवूडवर शोककळा! घरात झालेल्या अपघातामुळं दिग्दर्शकाचा मृत्यू! वयाच्या 57 व्या वर्षी संजय गुप्ता यांची एक्झिट

E Challan Fraud Alert: ई-चलन भरताना सावधान! बनावट लिंकवर क्लिक करण्याआधी अधिकृत पोर्टलची खात्री करा

SCROLL FOR NEXT