Maruti Suzuki Car Dainik Gomantak
अर्थविश्व

Maruti Suzuki : मारुतीच्या 'या' कारवर ग्राहक फिदा; शोरुममध्ये लागल्या रांगा

जर तुम्ही नवीन मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

जर तुम्ही नवीन मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला मारुतीच्या अशा कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मागच्‍या महिन्‍यात रेकॉर्डब्रेक विक्री नोंदवली आहे. यातून तुम्हाला मारुतीच्या कोणत्या गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे हे कळेल. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी बलेनो ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार होती. याच काळात मारुती सुझुकी वॅगनआर कार चौथ्या क्रमांकावर आहे.

गेल्या महिन्यात बलेनो कारच्या तब्बल 20,945 युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. या कारची प्रारंभिक किंमत 6.49 लाख रुपये असून टॉप एंड व्हेरियंटची किंमत 9.71 लाख रुपये आहे. तर मारुती सुझुकी अल्टो कारची गेल्या महिन्यात 15,663 युनिट्सची ग्राहकांनी खरेदी केली. या कारची किंमत 3.39 लाख रुपये असून टॉप मॉडेलची किंमत 5.03 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Swift कारच्या 15,153 युनिट्सची विक्री नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती. या कारची प्रारंभिक किंमत 5,91,900 रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 8.85 लाख रुपये इतकी आहे. Maruti Suzuki WagonR या कारच्या 14,720 युनिट्सची ग्राहकांनी खरेदी केली आहे. या कारच्या बेसिक व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 5,44,500 रुपये असून टॉप मॉडेलची किंमत 9,17,500 रुपये इतकी आहे.

Maruti Suzuki Dzire कारच्या 14,720 युनिट्सची नोव्हेंबरमध्ये विक्री करण्यात आली होती. या कारची किंमत 6.24 लाख रुपये पासून सुरु होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 7.20 लाख रुपये आहे. Maruti Suzuki Ertiga कारची किंमत 8.41 लाख रुपये ते 11.60 लाख रुपये मध्ये आहे. Maruti Suzuki Vitara Brezza 7.99 लाख रुपये ते 13.96 लाख रुपये दरम्यान उपलब्ध आहे.

Maruti Suzuki Eeco कार 4,63,200 रुपये ते 7,63,200 रुपये रुपयांच्या रेंजमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. Maruti Suzuki Ignis ही कार 5.35 लाख रुपयांपासून सुरु होत असून 7.72 लाख रुपयांपर्यंत या कारची रेंज जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT