Maruti Suzuki : वर्षअखेरीस अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात. तुमची जुनी कार देऊन त्याच्याबदल्यात तुम्हाला उत्तम ऑफर्स वर्षाच्या अखेरीस सुरु असलेल्या सेलमध्ये मिळत असतात. अशीच एक बंपर ऑफर मारुती सुझुकी घेऊन आली आहे. आता तुम्हाला तुमच्या जुन्या कारच्या बदल्यात मारुती कारच्या खरेदीवर चांगली ऑफर मिळू शकते. म्हणजे आता तुम्ही तुमच्या पार्किंगमधील जुनी कार काढून नवीन कार आणू शकता. मारुती सुझुकी तुम्हाला तुमच्या जुन्या कारच्या एक्स्चेंजवर तब्बल 10,000 रुपयांपर्यंत सूट देते.
मारुती सुझुकीची बलेनो नोव्हेंबर महिन्यात देशात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली होती. नोव्हेंबर महिन्यात कारच्या 20000 युनिट्सची विक्री झाली होती. ही मारुतीची प्रीमियम हॅचबॅक कार आहे, जी Nexa डीलरशिपद्वारे विकली जाते. मारुती या कारवर क्वचितप्रसंगी सूट देण्यात येते. पण या डिसेंबरमध्ये मारुती बलेनो आपल्या ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
एक्सचेंज ऑफर म्हणजे काय?
मारुती सुझुकी कंपनी डिसेंबर महिन्यात बलेनोच्या सर्व मॅन्युअल प्रकारांवर 20,000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये 10,000 रुपयांच्या ग्राहक ऑफरचा समावेश आहे. याशिवाय तुम्ही तुमची जुनी कार एक्सचेंज केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळेल. कंपनी AGS वर कोणतीही सूट देत नाही.
मारुतीच्या बलेनो कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 6.49 लाखांपासून सुरु होत आहे. हीच किंमत टॉप एंड व्हेरिएंटवर 9.71 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकीने नुकतेच आपल्या बलेनो कारचे सीएनजी मॉडेलही भारतात लॉन्च केले आहे. बलेनोचे सीएनजी मॉडेल दोन प्रकारात उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत या कारच्या CNG मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.28 लाख रुपये आहे. Baleno S-CNG मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. या कारचं इंजिन 5-स्पीड ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.