Maruti suzuki Cars Dainik Gomantak
अर्थविश्व

Maruti Suzuki Cars: मारुतीची आतापर्यंतची सर्वात प्रगत कार लॉंच, बुकिंगही झाले सुरू

ग्रँड विटाराचे उत्पादन ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

दीर्घ प्रतीक्षेनंतर कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली मध्यम आकाराची SUV Grand Vitara लॉंच करणार आहे. मारुती आणि टोयोटा यांच्या भागीदारीखाली तयार करण्यात आलेल्या या कारला देशात उपलब्ध Kia Seltos, Hyundai Creta, Volkswagen Taigun, MG Astor, Nissan Kicks, Skoda Kushaq यांसारख्या गाड्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. (Maruti Suzuki Cars News)

ग्रँड विटारा देशातील मार्केटमध्ये कंपनीच्या उपलब्ध एस-क्रॉस ची जागा घेईल. मारुतीने 2015 मध्ये एस-क्रॉस लाँच केले होते. परंतु आता कंपनीने भारतात एस-क्रॉसचे उत्पादन थांबवले आहे, त्यानंतर आता ग्रँड विटारा बाजारात त्याची जागा घेणार आहे. कंपनीने या कारसाठी बुकिंगही सुरू केले आहे.

* विक्री Nexa डीलरशिपद्वारे केली जाईल

विटारा ही मारुतीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात प्रगत कार असणार आहे. जी ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या कारला 1.5 लीटर K15C फोर सिलेंडर ड्युअलजेट माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळेल. मारुतीने (Maruti) एस-क्रॉसची विक्री नेक्सामार्फतच केली. 2017 मध्ये, एस क्रॉसचे फेसलिफ्ट मॉडेल देखील लाँच करण्यात आले, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता त्याच्या सेगमेंटमध्ये नवीन गाड्या आल्याने त्याची विक्री लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे आता त्याचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. या कारप्रमाणेच नवीन विटाराही नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाईल.

* क्रेटाशी स्पर्धा करेल

ग्रँड विटाराचे उत्पादन ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन कारच्या लॉंचसह, कंपनीला देशाच्या बाजारपेठेतील मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपला हिस्सा वाढवायचा आहे. 4.3 मीटर लांबीची मारुती विटारा ह्युंदाई क्रेटाशी स्पर्धा करेल. Kia Seltos आणि Toyota Urban Cruiser HyRyder हे सुद्धा त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT