Women's Day Special scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

महिला दिनी पत्नीच्या नावाने करा खास योजनेत गुंतवणूक, दरमहा मिळणार 44हजार रुपये

महिलांसाठी तुम्ही विशेष आर्थिक नियोजन करून आपल्या जवळच्या महिलेचे म्हणजे आई, बहिण, मैत्रिणीचे भविष्य सुरक्षित करू शकता.

दैनिक गोमन्तक

8 मार्च जागतिक महिला दिवस (Women's Day) म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी महिलांना विशेष वागणूक दिली जाते मात्र ही वागणूक किंवा एका महिलेबद्दलचा आदर काळजी फक्त एका दिवसासाठी मर्यादित न ठेवता या महिला दिनाला महिलांसाठी तुम्ही विशेष आर्थिक नियोजन करून आपल्या जवळच्या महिलेचे म्हणजे आई, बहिण, मैत्रिणीचे भविष्य सुरक्षित करू शकता.

तुम्हाला असे वाटत असेल की या खास दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा आईला असे गिफ्ट द्यावे जेणेकरून ती स्वावलंबी होईल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुमच्या अनुपस्थितीत घरात नियमित उत्पन्न (Regular Income) येत रहावे असे तुम्हाल वाटत असेल किंवा भविष्यात तुमची पत्नी पैशासाठी कोणावर अवलंबून राहू नये असे तुम्हाल वाटत असेल तर आजच तुम्ही तिच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. यासाठी तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता. जाणून घेवूया त्याबद्दल अधिक माहिती.

पत्नीच्या नावे नवीन पेन्शन

तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर नवीन पेन्शन सिस्टम (NPS) खाते उघडू शकता. NPS खाते तुमच्या पत्नीला 60 वर्षांचे झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. यासोबतच त्यांना दरमहा पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्नही मिळेल. एवढेच नाही तर NPS खात्याद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे देखील ठरवू शकता. यामुळे, वयाच्या 60 नंतर तुमची पत्नी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूया.

गुंतवणूक करणे देखील खूप सोपे आहे

तुम्ही नवीन पेन्शन सिस्टम (NPS) खात्यात तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर फक्त 1,000 रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. नवीन नियमांनुसार तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत NPS खाते चालवू शकता.

45 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न

उदाहरणार्थ, जर तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवत असाल आणि वार्षिक गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा मिळत असेल, तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये जमा होतील. यातून त्यांना सुमारे 45 लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे 45 हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हे पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.

तुम्हाला पेन्शन किती मिळेल?

वय - 30 वर्षे एकूण गुंतवणुकीचा कालावधी - 30 वर्षे

मासिक योगदान - 5,000 रूपये

गुंतवणुकीवर अंदाजे परतावा - 10 टक्के

एकूण पेन्शन फंड - 1,11,98,471 रूपये

अॅन्युइटी योजना खरेदी करण्याची रक्कम - 44, 79,388 रूपये

अंदाजे वार्षिकी दर 8 टक्के - 67,19,083 रूपये

मासिक पेन्शन - 44,793 रूपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT