Mahindra Thar Roxx Dainik Gomantak
अर्थविश्व

Mahindra Thar: महिंद्रासाठी 'ही' एसयूव्ही ठरली गेमचेंजर, 2.5 लाखांहून अधिक मॉडेल्सची विक्री; स्पर्धेत मारुती राहिली मागे

Mahindra Thar Sales Milestone: महिंद्रा थार एसयूव्हीने भारतीय मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठा गर्दा केला आहे. महिंद्रा थार एसयूव्हीने 2,50,000 विक्रीचा टप्पा ओलांडला.

Manish Jadhav

महिंद्रा थार एसयूव्हीने भारतीय मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठा गर्दा केला आहे. महिंद्रा थार एसयूव्हीने 2,50,000 विक्रीचा टप्पा ओलांडला. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये लॉन्च झाल्यापासून एप्रिल 2025 अखेरपर्यंत थारची एकूण विक्री 2,59,921 युनिट्सवर पोहोचली. सुरुवातीला तीन-दरवाजांचे मॉडेल म्हणून लॉन्च केलेली थार सप्टेंबर 2024 मध्ये थार रॉक्स नावाने 5-दरवाजांचे मॉडेल म्हणून लॉन्च करण्यात आले.

दरम्यान, 54 महिन्यांत महिंद्राच्या एकूण विक्रीत थारचा वाटा 15 टक्के झाला. आर्थिक वर्ष 2025 मध्ये थार ब्रँडची 12 महिन्यांतील सर्वोत्तम विक्री 84,834 युनिट्स होती, ज्यामध्ये 5-दरवाजांच्या थार रॉक्सचे केवळ सहा महिन्यांच्या विक्रीत 38,590 युनिट्स विकले, तर तीन-दरवाजांचे थारचे 12 महिन्यांत 46,244 युनिट्स विकले. विशेष म्हणजे, मारुतीने थारशी स्पर्धा करण्यासाठी जिम्नी देखील लॉन्च केली होती, परंतु विक्रीच्या बाबतीत ती तिच्या जवळपास पोहोचू शकली नाही.

54 महिन्यांत बनवला विक्रम

सेकंड जनरेशन थार मॉडेलच्या लॉन्चनंतर 54 महिन्यांनी 250,000 विक्रीचा टप्पा गाठला. साडेचार वर्षांत महिंद्रा अँड महिंद्राने एकूण 17,00,317 एसयूव्ही विकल्या, ज्यामध्ये ऑक्टोबर 2020 पासून कंपनीच्या विक्रीत थारचा 15 टक्के वाटा झाला. नवीन काळातील थार ही ऑफ-रोडिंग आवडणाऱ्या ग्राहकांची पहिली पसंती बनली. तसेच, शानदार इंटीरियर, दमदार फीचर्स, उत्कृष्ट ड्रायव्हिंग आणि ऑटोमॅटिक ऑप्शनमुळे ग्राहकांना थारने मोहिनी घातली. 25 सप्टेंबर 2024 रोजी थार रॉक्स लॉन्च करण्यात आल्यानंतर थारच्या विक्रीत आणखी मोठी वाढ झाली. एकेकाळी केवळ ऑफ-रोडिंगसाठी पसंत करण्यात आलेली थार आता फॅमिली कार बनली.

थारची किंमत किती आहे?

महिंद्रा थार ही एक नवीन काळातील 3 दरवाजे असलेली ऑफ रोड एसयूव्ही आहे, जी तरुण पिढीला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. ही शानदार गाडी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनांसह येते. थार रॉक्स हे त्याचे नवे व्हर्जन आहे. महिंद्रा थारची किंमत AX ऑप्ट हार्ड टॉप डिझेल RWD मॉडेलसाठी 11.50 लाख पासून सुरु होते आणि टॉप-एंड मॉडेल अर्थ एडिशन डिझेल AT ची किंमत 17.60 लाख आहे. महिंद्रा थार रॉक्सची किंमत 12.99 लाख पासून सुरु होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT