Manish Jadhav
महिंद्राने थार रॉक्ससह इंडियन कार ऑफ द इयर 2025 चा किताब जिंकून इतिहास रचला.
महिंद्राच्या एसयूव्हीने दुसऱ्या स्थानावर असलेल्या मारुती सुझुकी डिझायरला पछाडलं. मारुती सुझुकी स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
महिंद्रा थार रॉक्स ऑगस्ट 2024 मध्ये लाँच करण्यात आली. ही एसयूव्ही मार्केटमध्ये आधीच उपलब्ध असलेल्या थार एसयूव्हीची 5-डोर व्हर्जन आहे. या कारला लाँच झाल्यापासून खूप लोकप्रियता मिळाली आहे.
2025 च्या इंडियन कार ऑफ द इयर पुरस्काराच्या शर्यतीत, महिंद्रा थार रॉक्सने एकूण 139 गुण मिळवले, तर मारुती सुझुकी डिझायरने एकूण 137 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. मारुती सुझुकी स्विफ्टला 83 गुण मिळाले. इंडियन कार ऑफ द इयर (ICOTY) संस्थेने हा पुरस्कार थार रॉक्सला दिला.
महिंद्रा थार रॉक्समध्ये सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्ज, सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल (ESC) आणि सीटबेल्ट रिमाइंडर आहे. एंटरटेनमेंटसाठी, यात 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
महिंद्रा थार रॉक्सच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, सुरुवातीची किंमत 12.99 लाख रुपये आहे. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 22.49 लाख रुपयांपर्यंत जाते.