Mahindra And Mahindra Q4 Result Dainik Gomantak
अर्थविश्व

Mahindra And Mahindra Q4 Result: महिंद्राने मोडले कमाईचे सर्व विक्रम, चौथ्या तिमाहीत 2637 कोटी रुपयांचा नफा

Mahindra Q4 consolidated PAT : 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत एकत्रित नफा 18 टक्क्यांनी वाढून 2637 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हे ऑटोमोटिव्ह, कृषी उपकरणे आणि वित्तीय सेवा व्यवसायातील दमदार कामगिरीमुळे झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Profit Of Mahindra And Mahindra

देशातील लोकप्रिय कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या आर्थिक वर्षात प्रचंड नफा कमावला आहे. कंपनीने अधिकृत घोषणा करत ही माहिती दिली आहे. महिंद्रा अँड महिंद्राला आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत 18 टक्के एकत्रित नफा मिळाला आहे.

 महिंद्रा अँड महिंद्राने शुक्रवारी सांगितले की 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत एकत्रित नफा 18 टक्क्यांनी वाढून 2,637 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ऑटोमोटिव्ह, फार्म इक्विपमेंट आणि वित्तीय सेवा व्यवसायातील दमदार कामगिरीमुळे हा फायदा झाला आहे.

या मुंबईस्थित कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत 2,237 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 32,366 कोटी रुपये झाला, जो मागील वर्षी याच कालावधीत 25,934 कोटी रुपये होता.

कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी रु.10,282 कोटींचा एकत्रित नफा नोंदवला आहे, जो आर्थिक वर्ष 2022 मधील रु. 6,577 कोटींवरून 56 टक्क्यांनी वाढला आहे.

Mahindra & Mahindra ची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

कंपनीने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 चा नफा कंपनीने एका आर्थिक वर्षात नोंदवलेला सर्वाधिक नफा आहे. महिंद्रा अँड महिंद्राचा महसूल 2021-22 आर्थिक वर्षात 90,171 कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात 1,21,269 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यानुसार 34 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.महिद्रा अँड महिंद्राची ही कामगिरी आतापर्यंतच्या उत्कृष्ठ कामगिरींपैकी एक आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनिश शाह म्हणाले, "समूहासाठी हे एक ब्लॉकबस्टर वर्ष ठरले आहे. ऑटोने क्षेत्रातील विक्रमी कामगिरीने आम्हाला पुढील मार्ग दाखवला त्यातून आम्ही एसयूव्ही कमाईतील बाजारपेठेत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले." छोटी व्यावसायिक वाहने, कृषी उपकरणे आणि इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांमुळे कंपनी चांगली कामगिरी करू शकली, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT