LPG Price Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Price Hike: झळा महागाईच्या! कमर्शियल अन् घरगुती सिलेंडर झाले महाग

होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला असून एलपीजीच्या दरांत वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

देशभरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या चटक्याबरोबर आता महागाईचे चटके देखील सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आज पासून म्हणजेच 1 मार्च पासून घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

घरगुती सिलेंडरचे दर हे 50 तर कमर्शियल सिलेंडर तब्बल 350 रुपयांनी महाग झाले आहे. यामुळे इतर वस्तूंच्या किमती देखील वाढणार आहे. (Domestic LPG Cylinder Price Hiked)

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG) किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीत आता 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. 

चार महानगरांतील घरगुती सिलेंडर्सचे दर काय? 

दिल्लीत एलपीजीच्या किमती 1053 रुपयांवरुन 1103 रुपयांवर पोहोचल्यात.

मुंबईत एलपीजीची किंमत 1052.50 रुपयांवरुन 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.

कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 1079 रुपयांवरुन 1129 रुपयांपर्यंत वाढली आहे.

चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1068.50 रुपयांवरुन 118.50 रुपयांपर्यंत वाढली आहे.

  • 8 महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरच्या किमती वाढल्या

8 महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरच्या किमती वाढल्या असून याआधी 1 जुलै रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्येच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली नव्हती.

LPG चे दर कसे ठरवले जातात? 

देशातील एलपीजी गॅसची किंमत ही इम्पोर्ट पॅरिटी प्राइसने ठरवली जाते. याला IPP असे म्हणतात. भारत (India) बहुतांशी गॅसचा पुरवठा आयातीद्वारे पूर्ण केला जातो. त्यामुळे IPP देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीद्वारे निश्चित होतो.

सौदी अरेबियाच्या 'अरमाको' कंपनीच्या एलपीजी गॅस किंमतीच्या आधारे भारतातील गॅस दर निश्चित होतात. एलपीजीच्या किंमतीमध्ये गॅसचा दर, कस्टम ड्युटी, वाहतूक खर्च, विमा आदी घटकांचा समावेश आहे. 

याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमतीचा परिणाम देशातील गॅस दरांवरही होतो. मात्र, त्याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरणदेखील गॅसच्या दरांवर परिणाम करते. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये व्यवहार केला जातो. डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या घसरणीमुळे भारताला अधिक किंमत मोजावी लागत आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT