Cylinder New Update Dainik Gomantak
अर्थविश्व

Cylinder New Update: सावधान! ई-केवायसी न केल्यास गॅस सिलिंडरची डिलिव्हरी होणार बंद; 1 मे पासून नवीन नियम लागू, आजच करा 'हे' काम

LPG PNG Mandatory e-KYC 2026: केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी (LPG आणि PNG) ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली असून ज्या ग्राहकांनी अद्याप पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजली.

Manish Jadhav

LPG PNG Mandatory e-KYC 2026: केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी (LPG आणि PNG) ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली असून ज्या ग्राहकांनी अद्याप पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजली. सरकारने दिलेल्या आदेशानुसार, ज्यांचे व्हेरिफिकेशन अपूर्ण आहे, त्यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जाणार नाही, तसेच पीएनजी कनेक्शनची सुविधाही खंडित केली जाऊ शकते. डुप्लिकेट कनेक्शन रोखणे, सबसिडीचा दुरुपयोग थांबवणे आणि बंद पडलेली खाती शोधून काढणे या उद्देशाने तेल कंपन्यांनी 1 मे 2026 पासून सबसिडी असलेल्या गॅस सिलिंडरचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला.

नवीन नियमांनुसार, गॅस ग्राहकांचे (Customers) केवायसी होणे आणि बँक खाते सक्रिय असणे अनिवार्य आहे. जर एखाद्या ग्राहकाकडे दोन गॅस कनेक्शन असतील, तर त्यापैकी एक कनेक्शन तात्काळ बंद केले जाईल. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना त्यांचे एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे. जर पीएनजी असूनही एलपीजी कनेक्शन सरेंडर केले नाही, तर गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद केला जाऊ शकतो. ज्या ग्राहकांनी ही पडताळणी आधीच पूर्ण केली आहे, त्यांना गॅसचा पुरवठा सुरळीत सुरु राहील, मात्र इतरांना पडताळणी होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

याशिवाय, सिलिंडर (Cylinder) वितरणाची प्रक्रिया आता अधिक सुरक्षित करण्यासाठी 'ओटीपी' (OTP) आधारित डिलिव्हरी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ग्राहकाने सिलिंडर बुक केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक डिलिव्हरी कोड पाठवला जाईल. जेव्हा डिलिव्हरी एजंट सिलिंडर घेऊन येईल, तेव्हा त्याला हा कोड द्यावा लागेल, त्यानंतरच डिलिव्हरी पूर्ण होईल. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या गॅस वितरकाकडे जाऊन आधार आधारित ई-केवायसी पूर्ण करावी, मोबाईल नंबर अपडेट करावा आणि सबसिडी मिळवण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT