lpg cylinder rate 1 april 2022 price hiked by rs 250 on new financial year Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG सिलिंडर आजपासून 250 रुपयांनी महाग

22 मार्चपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी ग्राहकांना महागाईचा झटका

दैनिक गोमन्तक

LPG सिलिंडरचे नवीन दर आज जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी एलपीजी गॅस सिलिंडर एका झटक्यात 250 रुपयांनी महागला आहे. ही वाढ घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये नाही तर व्यावसायिक गॅस (gas) सिलिंडरमध्ये झाली आहे. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. कारण, अवघ्या 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते, तर 22 मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. (lpg cylinder rate 1 april 2022 price hiked by rs 250 on new financial year)

22 मार्चपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी ग्राहकांना महागाईचा झटका बसू लागला आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी वाढला आहे. कारण 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आज म्हणजेच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीही, घरगुती LPG सिलिंडर दिल्लीत 949.50 रुपये, कोलकात्यात 976 रुपये, मुंबईत 949.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 965.50 रुपये आहे.

आजपासून 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 250 रुपयांनी महागला आहे

1 मार्च 2012 रोजी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 22 मार्च रोजी 2003 रुपयांपर्यंत खाली आला. मात्र आजपासून ते दिल्लीत पुन्हा भरण्यासाठी 2253 रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर कोलकात्यात 2087 ऐवजी आता 2351 रुपये आणि मुंबईत (Mumbai) 1955 ऐवजी 2205 रुपये आजपासून खर्च करावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये आता त्याची किंमत 2138 रुपयांऐवजी 2406 रुपये असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT