Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC Saral Pension Yojana: सरकारची सुपरहिट स्कीम! आयुष्यभरासाठी मिळणार 50,000 रुपये पेन्शन

LIC Saral Pension Yojana: तुम्हालाही सुरक्षित आणि फायदेशीर योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.

दैनिक गोमन्तक

Saral Pension Yojana: तुम्हालाही सुरक्षित आणि फायदेशीर योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आत्तापर्यंत तुम्ही 60 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत पेन्शन मिळताना ऐकले किंवा पाहिले असेल. मात्र आता पेन्शनसाठी एवढी प्रतीक्षा करावी लागणार नाही. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने एक उत्तम योजना लाँच केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करुन वयाच्या 40 व्या वर्षीही पेन्शन मिळू शकते.

जाणून घ्या सरल पेन्शन योजना काय आहे?

LIC च्या या योजनेचे नाव सरल पेन्शन आहे, जी एकल प्रीमियम पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये प्रीमियम फक्त पॉलिसी घेताना भरावा लागतो. यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर एकल प्रीमियमची रक्कम नॉमिनीला दिली जाते. सरल पेन्शन योजना ही एक इमीडिएट एन्यूटी प्लान आहे, याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागते. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन (Pension) सुरु होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर मिळते.

ही पेन्शन योजना घेण्याचे दोन मार्ग आहेत

सिंगल लाईफ- यामध्ये पॉलिसी कोणाच्याही नावावर राहील, जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाईल.

जॉइंट लाइफ- यामध्ये दोन्ही जोडीदारांना कव्हरेज असते. जोपर्यंत प्रायमरी निवृत्तीवेतनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना निवृत्ती वेतन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाईल.

सरल पेन्शन योजना कोण घेऊ शकते?

या योजनेच्या लाभासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आणि कमाल 80 वर्षे आहे. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन संपूर्ण आयुष्यासाठी उपलब्ध आहे. सरल पेन्शन पॉलिसी सुरु झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

पेन्शन कधी मिळणार?

पेन्शन कधी मिळणार, हे पेन्शनधारकांनी ठरवायचे आहे. यामध्ये तुम्हाला 4 पर्याय मिळतात. तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी पेन्शन घेऊ शकता किंवा 12 महिन्यांनी घेऊ शकता. तुम्ही कोणताही पर्याय निवडाल, त्या कालावधीत तुमची पेन्शन येण्यास सुरुवात होईल.

तुम्हाला किती पेन्शन मिळेल माहित आहे?

मग आता प्रश्न उद्भवतो की, या सरल पेन्शन योजनेसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील, तर तुम्हाला ते स्वतः निवडावे लागेल. म्हणजेच, तुम्ही कितीही पेन्शन निवडाल, त्यानुसार तुम्हाला पैसे द्यावे लागतील. जर तुम्हाला दरमहा पेन्शन हवी असेल तर तुम्हाला किमान 1000 रुपये पेन्शन, तीन महिन्यांसाठी 3000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6000 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 12000 रुपये पेन्शन घ्यावे लागेल. कमाल मर्यादा नाही.

दुसरीकडे, तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि तुम्ही 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम जमा केला असेल, तर तुम्हाला वार्षिक 50250 रुपये मिळू लागतील जे आयुष्यभर उपलब्ध असतील. याशिवाय, जर तुम्हाला तुमची जमा केलेली रक्कम मध्यातच परत हवी असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला 5 टक्के वजा करुन जमा केलेली रक्कम परत मिळते.

कर्ज देखील मिळेल

तुम्हाला गंभीर आजार असल्यास आणि उपचारासाठी पैशांची गरज असल्यास, तुम्ही सरल पेन्शन योजनेत जमा केलेले पैसे काढू शकता. तुम्हाला गंभीर आजारांची यादी दिली जाते, ज्यासाठी तुम्ही पैसे काढू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर, मूळ किमतीच्या 95% परतावा दिला जातो. या योजनेत (सरल पेन्शन प्लॅन) कर्ज घेण्याचा पर्यायही दिला जातो. योजना सुरु झाल्यापासून 6 महिन्यांनंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT