LIC
LIC  Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC Policy: LIC ची सुपरहिट योजना! 233 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळवा 17 लाख

दैनिक गोमन्तक

LIC Jeevan Labh Policy: एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी उत्तम योजना देत राहते. एलआयसी प्रत्येक श्रेणीतील लोकांसाठी योजना बनवते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह करोडपती व्हायचे असेल, तर एलआयसीची ही पॉलिसी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. एलआयसी जीवन लाभ पॉलिसी ही अशीच एक पॉलिसी आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहा केवळ 233 रुपये जमा करुन 17 लाखांचा मोठा निधी मिळवू शकता. चला तर मग या पॉलिसीबद्दल जाणून घेऊया...

एलआयसी जीवन लाभ

जीवन लाभ (LIC जीवन लाभ, 936) नावाची ही नॉन-लिंक्ड पॉलिसी आहे. यामुळे या पॉलिसीचा शेअर बाजाराशी (Stock Market) काहीही संबंध नाही. बाजार वर गेला किंवा खाली, त्याचा तुमच्या पैशांवर अजिबात परिणाम होणार नाही. म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही एक मर्यादित प्रीमियम योजना आहे. मुलांचे लग्न, शिक्षण, मालमत्ता खरेदी या गोष्टी लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे.

पॉलिसीची खासियत

LIC ची जीवन लाभ योजना नफा आणि संरक्षण दोन्ही देते.

8 ते 59 वयोगटातील लोक ही पॉलिसी सहज घेऊ शकतात.

पॉलिसीची मुदत 16 ते 25 वर्षांपर्यंत घेतली जाऊ शकते.

किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागेल.

कमाल रकमेवर मर्यादा नाही.

3 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यावर कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.

प्रीमियमवर कर सूट आणि पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला विमा रक्कम आणि बोनसचे फायदे मिळतात.

नॉमिनीला मृत्यू लाभ मिळेल

जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसीच्या मुदतीदरम्यान झाला आणि त्याने मृत्यूपर्यंत सर्व प्रीमियम भरले, तर त्याच्या नॉमिनीला डेथ सम अ‍ॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस डेथ बेनिफिट म्हणून मिळतो. म्हणजेच, नॉमिनीला अतिरिक्त विम्याची रक्कम मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Tim Cook: ‘’ॲपलच्या भारतातील कामगिरीवर खूप खूश, प्रतिस्पर्धी म्हणून राहण्यासाठी...’’

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT