अनेक कारणांमुळे आणि अनेक महिन्यांच्या विलंबानंतर आता देशातील सर्वात मोठ्या IPO च्या आगमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी विमा कंपनी LIC चा IPO 4 मे रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे आणि 9 मे पर्यंत बोलीसाठी खुला असणार आहे. LIC च्या या मेगा IPO साठी 902 रुपये ते 949 रुपये किंमतीचा पट्टा निश्चित करण्यात आला आहे. या IPO मध्ये, एका लॉटमध्ये (LIC IPO Lot) 15 शेअर्स असतील. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा बहुप्रतिक्षित IPO पुढील महिन्यात येत आहे, ज्याची किंमत 21,000 कोटी रुपये आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असल्याचे सांगितले जात आहे. (Life Insurance Corporation IPO)
LIC IPO मध्ये मिळणार सूट
कंपनीच्या बोर्डाने LIC IPO मधील कर्मचाऱ्यांसाठी 45 रुपये आणि LIC च्या पॉलिसीधारकांसाठी 60 रुपये सूट निश्चित केली आहे. LIC IPO ची शेअर बाजारात लिस्टिंग 17 मे रोजी होणार आहे. बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने या आयपीओचा आकार कमी केला आहे. आता सरकार LIC मधील 3.5 टक्के स्टेक कमी करणार आहे. या IPO च्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा विचार आहे. आकार कमी केल्यानंतरही हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असणार आहे.
गुंतवणूकदारांना ऑनलाइन बँकिंगद्वारे लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्यांना गुंतवणूक विभागात जावे लागेल. त्यानंतर गुंतवणूकदार IPO/e-IPO पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर डिपॉझिटरी तपशील आणि बँक खात्याचा तपशील भरावा लागेल. त्यानंतर पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल.
पडताळणी प्रक्रियेनंतर, तुम्हाला IPO विभागात गुंतवणूक करावी लागेल. तेथे तुम्ही सार्वजनिक ऑफर निवडा ज्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्यानंतर गुंतवणूकदारांना समभागांची संख्या आणि बिड प्राइस सिलेक्ट करणे आवश्यक आहे. (LIC IPO terms and conditions check how to apply)
नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा
गुंतवणूकदारांनी त्यांची बोली लावण्यापूर्वी अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. शेअर्स खरेदी केल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्यांना शेअर्सचे वाटप झाले आहे की नाही हे आवर्जून तपासायला हवे.
हे देखील आवश्यक आहे
एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओमध्ये कोणते फायदे मिळतील, कोण अर्ज करू शकेल, काय आवश्यक असेल असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना पडले असेल. तर गुंतवणूकदारंच्या पॅन कार्डचे तपशील अपडेट केले असतील तरच तुम्ही गुंतवणूक करू शकाल,
ग्रुप एलआयसी पॉलिसीवर फायदे मिळणार नाहीत
तुमच्याकडे LIC ची ग्रुप पॉलिसी असल्यास, तुम्ही या IPO मध्ये आरक्षण किंवा सूट मिळवू शकत नाही. एलआयसीने स्पष्ट केले आहे की ग्रुप पॉलिसीचे पॉलिसीधारक आगामी IPO मध्ये आरक्षणासाठी पात्र असणार नाहीत. याचा अर्थ असा की जर तुम्हाला तुमच्या कंपनीकडून LIC ची ग्रुप पॉलिसी मिळाली असेल, तर तुम्ही या पॉलिसीच्या आधारे आरक्षण आणि सूट मिळण्यास पात्र नाही.
अशा पॉलिसीधारकांनाही कोणताही लाभ मिळणार नाही
देशातील सर्वात मोठ्या IPO मध्ये दिल्या जाणाऱ्या सवलती आणि आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिकत्व आवश्यक आहे असे सरकारी विमा कंपनीने स्पष्ट केले आहे. FAQ नुसार, जे पॉलिसीधारक अनिवासी भारतीय आहेत किंवा भारतात राहत नाहीत त्यांना IPO मध्ये आरक्षण आणि सवलतीचा लाभ मिळणार नाही. या दोन श्रेणी वगळता, एलआयसीचे इतर सर्व पॉलिसीधारक विशेष सवलतींचा लाभ घेऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.