Adani Debt: अदानी समुहात सुरू असलेल्या उलथापालथीची चर्चा सध्या देशापासून परदेशातही होत आहे. 24 जानेवारीपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू झालेली घसरण आजतागायत सुरू आहे.
अदानी ग्रुपमधील कंपन्यांत मोठी गुंतवणूक असलेल्या एसबीआय आणि एलआयसी यांनाही त्यामुळे मोठा तोटा झाला आहे. शिवाय या दोन्ही संस्थांनी अदानी समुहाला मोठे कर्ज दिले आहे.
देशातील अनेक बँकांचे मिळून अदानी समूहावर 80,000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. सरकारच्या सांगण्यावरून सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका आणि एलआयसीने अदानी समूहाला मोठ्या प्रमाणावर कर्जे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अदानी समुहावर कुठल्या बँकेचे किती कर्ज आहे, हे जाणून घेऊया.
स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा यांनी त्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. एसबीआयने त्यांनी दिलेल्या कर्जाला धोका नसल्याचे म्हटले आहे. अदानी समुहाकडे असलेल्या एकूण कर्जापैकी एसबीआयचे कर्ज हे एसबीआयच्या एकूण कर्ज पुस्तकाच्या केवळ 0.8 टक्के ते 0.9 टक्के आहे.
अदानी ग्रुपवर स्टेट बँकेचे किती कर्ज ?
अदानी ग्रुपला दिलेल्या कर्जाबाबत, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, अदानी समुहाला एसबीआयचे 27,000 कोटी रुपये कर्ज आहे, जे एकूण कर्जाच्या केवळ 0.8 ते 0.9 टक्के आहे. आम्ही अदानी समूहाच्या मूर्त मालमत्तेसाठी कर्ज दिले आहे. अदानी समूह बँकेच्या कर्ज भरण्यास सक्षम आहे.
PNB आणि बँक ऑफ बडोदाचे अदानी ग्रुपवरील कर्ज?
अदानी समुहावर बँक ऑफ बडोदाचे 5500 कोटी तर पंजाब नॅशनल बँकेचे 7000 कोटींचे कर्ज आहे.
एलआयसीच्या कर्जाचा आकडाही मोठा
एलआयसीकडून अदानी समूहाने 36,474.78 कोटी रुपये कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज आणि इक्विटीच्या रूपात आहे. LIC ने अदानी एंटरप्रायझेसच्या नुकत्याच झालेल्या FPO मध्ये 9,15,748 शेअर्स खरेदी करण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले आणि एलआयसीची अदानी एंटरप्रायझेसमध्ये यापुर्वीच 4.23 टक्के हिस्सेदारी आहे.
एलआयसीची अदानी समूहातील इतर कंपन्यांमध्येही भागीदारी आहे, ज्यात अदानी पोर्ट्समधील 9.14 टक्के आणि अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के हिस्सा आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या किंमती घसरल्याने एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्यही कमी होत आहे, त्यामुळे एलआयसीसाठी हा चिंतेचा विषय असेल.
अदानी ग्रुपवरील अॅक्सिस बँकेचे कर्ज
अॅक्सिस बँकेने म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही कंपनीला कर्जाची रक्कम केवळ सुरक्षा, दायित्व आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता या आधारावर देतो. अदानी समूहाला दिलेले फंड आधारित कर्ज 0.29 टक्के आहे, तर नॉन फंड आधारित कर्ज 0.58 टक्के आहे.
दरम्यान, बँकांव्यतिरिक्त LIC सारख्या वित्तीय संस्थांचे कर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्कच्या मर्यादेपेक्षा कमी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.