Pope Francis: पोप फ्रान्सिस पुढच्या वर्षी करणार भारत दौरा...

मंगोलियाला भेट देणारे पहिले पोप ठरणार?
Pope Francis
Pope Francis Dainik Gomantak

Pope Francis: पुढच्या वर्षी भारताला भेट देण्याची योजना असल्याची माहिती, नुकतेच पोप फ्रान्सिस यांनी दिली. दक्षिण सुदानहून रोमला परत येताना त्यांनी त्यांच्या आगामी प्रवासाच्या रूपरेषेविषयी माहिती दिली. पोप फ्रान्सिस यांनी कांगो आणि दक्षिण सुदानच्या सहा दिवसांच्या भेटीनंतर दक्षिण सुदानची राजधानी जुबा येथे पत्रकारांशी संवाद साधला.

Pope Francis
Earthquake in Turkey: तुर्कीत मोठा भूकंप रिश्टल स्केलवर 7.8 तीव्रता

फ्रान्सिस म्हणाले की, 2017 मध्ये भारताला भेट देण्याची योजना बारगळ्यानंतर आता 2024 मध्ये भारताला भेट देईन. याचवर्षी मंगोलियाला भेट देण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तसे झाले तर मंगोलियाला भेट देणारे ते पहिले पोप ठरतील.

ख्रिश्चन समुदायात सर्वोच्च धर्मगुरू म्हणून पोप या पदाला मानाचे स्थान आहे. यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जागतिक युवा दिनासाठी ते लिस्बन, पोर्तुगाल येथे असतील आणि 23 सप्टेंबर रोजी मार्सेल, फ्रान्स येथे भूमध्यसागरीय बिशपच्या बैठकीत सहभागी होतील.

मार्सेलहून मंगोलियाला जाण्याची शक्यता आहे, तसे झाल्यास ते मंगोलियाला जाणारे पहिले पोप ठरतील. यापुर्वी एकाही पोपनी मंगोलियाचा दौरा केलेला नाही.

Pope Francis
Pakistan Army Judiciary: पाकिस्तानात लष्कर, न्यायालयाविरोधात बोलल्यास 'इतकी' वर्षे तुरुंगवास

कँटरबरीचे मुख्य बिशप जस्टिन वेल्बी आणि चर्च ऑफ स्कॉटलंडचे नियंत्रक रेव्ह. इयन ग्रीनशील्ड्स हे देखील पोप यांच्यासमवेत होते. या नेत्यांनी मिळून दक्षिण सुदान शांतता कराराची अंमलबजावणी करण्यासाठी या देशाचा संयुक्त दौरा केला.

2011 मध्ये सुदानपासून स्वतंत्र झाल्यानंतर येथे यादवी, गृहकलह माजला होता. ही यादवी संपविणाऱ्या 2018 च्या शांतता कराराच्या अंमलबजावणीसाठी हे धार्मिक नेते या दौऱ्यावर गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com