Girls Dainik Gomantak
अर्थविश्व

Kanya Sumangala Yojana: सरकार मुलींना देतेय 15 हजार रुपये, वाचा सविस्तर

Kanya Sumangala Yojana Registration Process: जर तुम्हीही मुलीचे पालक असाल तर सरकारकडून मुलीसाठी मिळणाऱ्या 15 हजार रुपयांचा तुम्हीही लाभ घेऊ शकता.

दैनिक गोमन्तक

How To Register For Kanya Sumangala Yojana: जर तुम्हीही मुलीचे पालक असाल तर सरकारकडून मुलीसाठी मिळणाऱ्या 15 हजार रुपयांचा तुम्हीही लाभ घेऊ शकता. शासनाकडून मुलींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पालनपोषणापासून ते शिक्षण आणि लग्नापर्यंत अनेक योजना आहेत. कन्या सुमंगला योजना (Kanya Sumangala Yojana) हे सरकार चालवत असलेल्या अशाच एका योजनेचे नाव आहे.

दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात

कन्या सुमंगला योजनेंतर्गत सरकार मुलींना 15 हजार रुपये देत आहे. सरकारच्या (Government) या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन मुली घेऊ शकतात. मुलीचे पालणपोषण आणि शिक्षणाच्या दृष्टीने सरकार हे पैसे सहा हप्त्यांमध्ये देते. योगी सरकार मुलींची काळजी घेण्यासाठी 15,000 रुपये देतेय.

14 लाख मुलींना लाभ देण्यात आला

गेल्या काही दिवसांत विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सांगितले होते की, 'यूपीमध्ये मुलींसाठी कन्या सुमंगला योजना राबवली जात आहे.' आतापर्यंत राज्यातील 14 लाख मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेचा लाभ अशा कुटुंबांना उपलब्ध आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले पालक मुलीच्या जन्मानंतर या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

पहिल्या हप्त्यात 2,000 रुपये मिळतील

या योजनेत सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मुलीचे खाते उघडावे लागेल. जन्मानंतर पहिला हप्ता 2,000 रुपये आहे. लसीकरणानंतर (Vaccination) दुसरा हप्ता म्हणून 1,000 रु. जेव्हा मुली पहिलीत प्रवेश करतात तेव्हा 2000 रुपयांचा तिसरा हप्ता उपलब्ध होतो.

पदवी प्रवेशासाठी 5000 रुपये

यानंतर मुलींनी सहावीत प्रवेश घेतल्यास त्यांना चौथ्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये मिळतात. त्याच वेळी, 9 वीमध्ये प्रवेश घेतल्यावर, तुम्हाला पाचव्या हप्त्यासाठी 3,000 रुपये मिळतात. अशा प्रकारे आत्तापर्यंत एकूण 10 हजार रुपये झाले. यानंतर, उर्वरित 5000 रुपये 10 वी-12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT