Johnson & Johnson Dainik Gomantak
अर्थविश्व

Johnson & Johnson: जॉन्सन बेबी पावडरची विक्री होणार बंद

फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन 2023 मध्ये जगभरात टॅल्क-आधारित बेबी पावडरची विक्री थांबविली आहे.

दैनिक गोमन्तक

फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन 2023 मध्ये जगभरात टॅल्क-आधारित बेबी पावडरची विक्री थांबविली आहे. औषध निर्मात्याने गुरुवारी सांगितले की, यूएसमध्ये सुरू असलेल्या हजारो ग्राहक सुरक्षा प्रकरणांमुळे त्यांनी उत्पादनाची विक्री थांबविली आहे. कंपनीने सांगितले की, बेबी पावडर जगभरातील देशांमध्ये आधीच विकली जाते पण आता तो जगभरातील पोर्टफोलिओ काढून टाकला जाणार आहे. (Johnson & Johnson Johnson baby powder to be discontinued)

2020 मध्ये, कंपनीने अमेरिका आणि कॅनडामध्ये पावडरची विक्री थांबवली आहे. या पावडरमध्ये एस्बेस्टोसचा एक प्रकारचा हानिकारक फायबर आढळून आला होता, जो कर्करोगाचे कारण असल्याचे मानले जात होते आणि या प्रकरणात 35 हजार महिलांनी गर्भाशयाचा कर्करोग झाल्याबद्दल कंपनीवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे अमेरिकेत त्याची मागणी लक्षणीयरीत्या कमी झाली होती तसेच यावर कंपनीने 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्री कमी झाल्याच्या कारणास्तव बंद केली, परंतु तरीही ब्रिटनसह जगातील इतर देशांमध्ये त्याची विक्री सुरूच आहे.

न्यायालयाने सुमारे 15,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता,

अमेरिकेतील एका न्यायालयाने या पावडरमुळे गर्भाशयाच्या कर्करोगामुळे कंपनीला 15,000 कोटी रुपयांचा दंड याआधी ठोठावला होता. यावेळी न्यायालयाने म्हटले होते की, कंपनीने मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे तर कंपनीवर आपल्या उत्पादनांमध्ये एस्बेस्टोस मिसळल्याचा आरोप होता. कंपनीने केलेल्या गुन्ह्याची पैशाशी तुलना होऊ शकत नाही, असेही न्यायाधीशांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले होते. पण गुन्हे वाढले की नुकसानही मोठे व्हायला हवे असंही न्यायालयाने म्हटले आहे.

1894 पासून विकली जात असलेली पावडर,

जॉन्सन बेबी पावडर 1894 पासून विकली जात आहे, हे कौटुंबिक अनुकूल असल्यामुळे कंपनीचा लोगो उत्पादन बनले होते. 1999 पासून, कंपनीचा इंटरनल बेबे प्रोडक्ट डिवीजन त्याचे मार्केटींग रिप्रेजेंटेशन करत होते. J&J च्या "#1 मालमत्ता" प्रमाणे यात प्रामुख्याने बेबी पावडर असते तर आता कंपनीने अमेरिकेत बेबी पावडर पूर्णपणे बंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT