reliance jio  Dainik Gomantak
अर्थविश्व

Reliance Industry: Google च्या सहकार्याने Jio तयार करणार स्वस्त 5G स्मार्टफोन

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की रिलायन्स जिओ Google च्या सहकार्याने भारतासाठी अल्ट्रा-परवडणारे 5G स्मार्टफोन तयार करणार आहे.

दैनिक गोमन्तक

रिलायन्स जिओ दिवाळीपूर्वी देशात 5G सेवा सुरू करणार आहे. त्याच वेळी, 5G सेवा वापरणाऱ्या वापरकर्त्यांना स्वस्त मोबाइल हँडसेट देण्यासाठी कंपनीने Google सोबत करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमला संबोधित करताना, अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओ Google च्या सहकार्याने भारतासाठी अल्ट्रा-परवडणारे 5G स्मार्टफोन तयार करणार आहे.

(Jio to make cheap 5G smartphone in collaboration with Google)

खरेतर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये भागधारकांना संबोधित करताना, मुकेश अंबानी यांनी 5G सेवांच्या रोलआउटची संपूर्ण ब्लू प्रिंट सादर केली आहे. ते म्हणाले की, रिलायन्स जिओचे 5G नेटवर्क जगातील सर्वात वेगवान नेटवर्कपैकी एक असेल.

याआधीही रिलायन्सने जिओफोन तयार करण्यासाठी गुगनसोबत करार केला होता. गेल्या वर्षी, जिओने गुगलच्या सहकार्याने JioPhone Android स्मार्टफोन लॉन्च केला होता. हे खास भारतीय बाजारपेठ आणि जिओसाठी तयार करण्यात आले होते. आता जिओ Google च्या सहकार्याने स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

जुलै 2021 मध्ये, Google आणि Jio Platforms यांच्यात प्रवेश-स्तरीय परवडणारा स्मार्टफोन विकसित करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. Google ने Jio Platforms मधील 7.73 टक्के हिस्सेदारी 4.5 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली आहे.

तत्पूर्वी, 45 व्या एजीएमला संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओ दिवाळीपर्यंत देशात 5G सेवा सुरू करेल. ते म्हणाले की, पहिली 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मेट्रो शहरांमधून सुरू केली जाईल. यानंतर 2023 च्या अखेरीस देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा उपलब्ध होईल. अध्यक्षांनी सांगितले की रिलायन्स जिओ 5G सेवांसाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT