Modi-Kishida meet News, Japanese PM Kishida in India News, Latest Japanese investment in India News,  Dainik Gomantak
अर्थविश्व

जपान भारतात करणार 3.2 लाख कोटींची गुंतवणूक

दोन्ही देशांनी सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

दैनिक गोमन्तक

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, "जपान येत्या पाच वर्षांत भारतात 5 लाख कोटी येन (सुमारे 3.2 लाख कोटी रुपये) गुंतवणूक करेल." (PM Modi-Kishida meet News)

किशिदा यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत पीएम मोदी म्हणाले की, "दोन्ही देशांना सुरक्षित, विश्वासार्ह, स्थिर ऊर्जेचे महत्त्व समजले आहे. शाश्वत आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे आणि हवामान (Climate) बदलाचा सामना करणे महत्त्वाचे आहे."

विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याशिवाय स्वच्छ ऊर्जेसाठीही दोन्ही देशांनी भागीदारी केली. दोन्ही देशांमधील संबंधांचा संदर्भ देत जपानी पंतप्रधान म्हणाले की, "जपानने येत्या पाच वर्षांत भारतात (India) पाच लाख कोटी येन (रु. 3.2 लाख कोटी) गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे."

रशिया-युक्रेन युद्धाबाबतही किशिदा म्हणाले की, "पीएम मोदींसोबतच्या बैठकीत युक्रेनमधील परिस्थितीवरही चर्चा झाली. जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याची गरज आहे." किशिदा यांनी युद्धाबाबत (War) चिंता व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cipla Share Price: सिप्लाच्या गोव्यातील प्लांटला Good Tag; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ

Diwali 2024: उधळण आनंदाची! तेजोमय दिव्यांना बहरलेला 'दिपोत्सव'

Goa Monsoon 2024: पेडणे, सत्तरी, डिचोलीत ढगाळ वातावरण; तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

VIDEO: धक्कादायक! मोकाट कुत्र्याच्या शेपटीला बांधून तरुणाने फोडले फटाके; व्हिडिओ व्हायरल

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार

SCROLL FOR NEXT