ITR filing Last Date 2023: आयकर रिटर्न (ITR) वेळेवर भरणे अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. देय तारखेच्या आत तुमचा ITR दाखल करण्यात अयशस्वी ठरल्यास दंड आणि व्याज आकारले जाऊ शकते.
त्यामुळे वेळेवर आयटीआर दाखल करून, तुम्ही या अनावश्यक आर्थिक दंड आणि कारवाईपासून दूर राहू शकता.
तसेच, तुम्ही कर परताव्यासाठी पात्र असल्यास, तुमचा ITR तत्काळ दाखल केल्याने तुम्हाला तुमचा परतावा लवकर मिळेल.
आयटीआर दाखल केल्यानंतर रिफंडची प्रक्रिया वेळेवर सुरू होते आणि फाइल करण्यास उशीर केल्याने रिफंड प्रक्रियेस विलंब होतो.
5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना उशीरा ITR दाखल केल्यास 5000 रुपये दंड आकारला जातो.
पुढे तुम्ही वाढीव मुदत ३१ डिसेंबर २०२३ नंतर आयटीआर फाइल केल्यास तुम्हाला १०,००० रुपये दंड भरावा लागेल.
31 जुलैपर्यंत रिटर्न भरण्यात अयशस्वी झाल्यास रिटर्न दाखल होईपर्यंत दरमहा 1% अतिरिक्त व्याज भरावे लागेल.
मुदतवाढ देऊनही रिटर्न न भरल्यास अधिकारी कर थकबाकीच्या आधारे तीन महिने ते ७ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासासह खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात.
वेळेत आयटीर फाइल न करण्याचा आणखी एक संभाव्य तोटा म्हणजे कराचा परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो. अशा विलंबामुळे अनावश्यक आर्थिक ताण आणि गैरसोय होऊ शकते.
आर्थिक वर्ष 2022-23 साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. अंतिम मुदत ही चार महिन्यांच्या विंडोची शेवटची तारीख आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.