GoFirst एअरलाइन्स गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आली आहे. दरम्यान, आणखी एक मोठी एअरलाइन अडचणीत आली आहे. देशाच्या आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार आहे.
स्पाईसजेट (SpiceJet) या विमान कंपनीच्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सोमवार, 08 मे रोजी सुनावणी होणार आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) सोमवारी स्पाइसजेटच्या कर्जदात्याने दाखल केलेल्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
स्पाइसजेट विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणीही सोमवारी होणार आहे. स्पाइसजेटच्या एका कर्जदार कंपनीने स्पाईसजेट विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. एनसीएलटी यावर सोमवारी सुनावणी करणार आहे.
एअरक्राफ्ट लेसर एअरकॅसल (आयर्लंड) लिमिटेड या कमी किमतीच्या विमान कंपनीला कर्ज देणार्या कंपनीने एनसीएलटीसमोर एअरलाईन विरुद्ध दिवाळखोरी याचिका दाखल केली आहे. कंपनीने 28 एप्रिललाच हा अर्ज दिला होता, या प्रकरणावर 8 मे रोजी सुनावणी होणार आहे.
यापूर्वी, GoFirst च्या मालकीच्या वाडिया समूहाने स्वतः दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच वेळी, आणखी दोन कंपन्यांनी दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्पाईसजेटच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
दिवाळखोरीच्या या प्रक्रियेबाबत त्यांच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही. हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवला जाईल, अशी आशा स्पाइसजेटने व्यक्त केली आहे.
एनसीएलटीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, स्पाइसजेट विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याशी संबंधित दोन अन्य याचिका प्रलंबित आहेत. दिवाळखोरीचा अर्ज विलिस लीज फायनान्स कॉर्पोरेशनने 12 एप्रिल रोजी दाखल केला होता, तर एकर्स बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेडने 4 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही याचिकांबाबत स्पाईसजेटकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.