IRCTC Tour Packages
IRCTC Tour Packages Dainik Gomantak
अर्थविश्व

IRCTC Tour Packages: IRCTC तर्फे स्पेशल टूर पॅकेज! गोवा, शिर्डी अन् अजिंठाची ट्रीप ठरेल अविस्मरणीय...

Puja Bonkile

IRCTC च्या नवीन टूर पॅकेजमुळे पर्यटक गोवा, शिर्डी आणि अजिंठा एलोराला भेट देऊ शकतात. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना भारत गौरव ट्रेनमधून प्रवास करण्याची सोय केली जाणार आहे. या टूर पॅकेजचे नाव गोवा विथ शिर्डी अजिंठा एलोरा असे आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक EZBG04 क्रमांकाच्या ट्रेनने प्रवास करतील . या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना 3AC आणि SL वर्गात प्रवास करता येणार आहे. टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना दक्षिण आणि उत्तर गोव्याच्या दौऱ्यावर नेण्यात येणार आहे. आयआरसीटीसीने ट्विटद्वारे या टूर पॅकेजची माहिती दिली आहे. 

  • 10 रात्री आणि 11 दिवसांसाठी टूर पॅकेज

आयआरसीटीसीचे (IRCTC) हे गोवा, शिर्डी आणि अजिंठा एलोरा टूर पॅकेज 10 रात्री आणि 11 दिवसांचे आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना भारत गौरव ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये रेल्वे प्रवाशांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असणार आहे. या ट्रेनमध्ये एकूण 790 जागा आहेत. ज्यामध्ये 3AC च्या 310 जागा आहेत. 

या टूर पॅकेजमध्ये कोलकाता, बंदेल जंक्शन, वर्धमान, दुर्गापूर, आसनसोल, धनबाद, चंद्रपुरा, बोकारो स्टील सिटी, मुरी, रांची, राउरकेला, झारसुगुडा, रायगड, चंपा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया आणि नागपुर येथून पर्यटक बोर्डिंग करतात आणि डी-बोर्डिंग करू शकतात.

  • हे टूर पॅकेज कधी सुरू होत आहे

आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गोवा, शिर्डी आणि अजिंठा एलोरा टूर पॅकेज 23 ऑगस्ट रोजी संपणार आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी भाडे वेगळे आहे. 

इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति व्यक्ती 21,050 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. 

स्टँडर्ड श्रेणीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति व्यक्ती 31,450 रुपये भाडे द्यावे लागेल. 

कंफर्ट क्लास प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 34,500 रुपये भाडे द्यावे लागेल. 

पर्यटनाला चालना देण्यासाठी IRCTC विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते. या टूर पॅकेजमधून प्रवासी बजेटमध्ये प्रवास अनेक ठिकाणांना बेट देउ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT