Disadvantage of amt Cars: जर तुम्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार (AMT) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या साठीच आहे. एएमटी वाहने चालवताना थकवा येत नाही. तसेच आता या कार कमी किंतीत उपल्बध झाल्या आहेत. यामुळे अनेक लोक ही कार खरेदी करण्याकडे वळतात. पण तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारच्या या 5 प्रमुख तोट्यांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
किंमत
ऑटोमॅटिक कार मॅन्युअल वाहनांपेक्षा महाग आहेत. पण एमजीच्या या वाहनांमध्ये उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो. कारण ते चालवण्यासाठी तुम्हाला क्लच आणि गियर वारंवार बदलण्याची गरज नाही.
कमी मायलेज
मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारपेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कार जास्त इंधन वापरतात. कारण मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये तुम्ही तुमच्यानुसार कमी स्पीड आणि हाय स्पीड ठरवू शकता.
जेव्हा तुम्हाला कार हळू चालवावी लागते, तेव्हा तुम्ही गियरमध्ये बदल करता, तर हाय स्पीडमध्ये चालवतांना तुम्ही गियर टॉपमध्ये टाकून चालवता. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये असे होत नाही.
ओव्हरटेक करता येत नाही
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये ओव्हरटेक (Overtake) करणे खूप अवघड असते. कारण मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार गीअर बदलून स्पीड वाढवू शकता, पण ऑटोमॅटिक कारमध्ये (Car) असे करता येत नाही. कारण जेव्हा तुम्ही ओव्हरटेक करण्यासाठी स्पीड वाढवता तेव्हा ते
कार रोलबॅकवर आदळते
ऑटोमॅटिक कारची सर्वात मोठी समस्या ही आहे की जेव्हाही तुम्ही गाडीला उतार असलेल्या ठिकाणी घेऊन जाता आणि गाडी अचानक थांबवावी लागते, तेव्हा ती गाडी पुन्हा अॅक्सिलरेटरने चालवताना मागे धावू लागते. हे अनेक प्रसंगी अतिशय धोकादायक ठरू शकते. खास करुन जेव्हा तुम्ही डोंगराळ रस्त्यावरून गाडी चालवत असता तेव्हा असी समस्या निर्माण होउ शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.