IRCTC Ticket Booking Rules
IRCTC Ticket Booking Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

IRCTC च्या नियमांमध्ये बदल, एकाच खात्यावरून करता येणार 24 तिकिटांच बुकिंग

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही अनेकवेळा रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. भारतीय रेल्वेने IRCTC ने तिकिटांच्या बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, IRCTC अॅप (App) आणि वेबसाइटद्वारे (Web Site) तुम्हाला प्रथम तुमचे अकाउंट तपासावे लागेल, त्यानंतर तिकीट बुकिंग केले जाईल. तसेच, आता एका युजर आयडीवर एका महिन्यात जास्तीत जास्त तिकीट बुक करण्याची मर्यादा 12 वरून 24 करण्यात आली आहे. जे खूप प्रवास करतात त्यांच्यासाठी ही बातमी आंनदाची आहे. (IRCTC Ticket Rules News 2022)

व्हेरिफिकेशन गरजेचे

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या नवीन नियमांनुसार, आता वापरकर्त्यांना तिकीट बुक करण्यापूर्वी मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी (E-Mail ID) वॅरिफिकेशन करणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरचे (Mobile Number) व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकणार नाही.

या नियमाची गरज का पडली

IRCTC खात्याचे देशभरात लाखो वापरकर्ते आहेत. त्यापैकी हजारो लोकांनी कोरोना महामारी (Corona) सुरू झाल्यापासून ऑनलाइन तिकिटे बुक केलेली नाहीत. हा नियम फक्त अशा लोकांसाठी लागू करण्यात आला आहे. जर तुम्हीही खूप दिवसांपासून तिकीट बुक केले नसेल, तर आधी व्हेरिफिकेशन करणे आवश्यक झाले आहे.

व्हेरिफिकेशन कसे करावे

IRCTC अॅप किंवा वेबसाइटवर जा आणि व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा .

* येथे तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका, त्यानंतर Verify वर क्लिक करा.

* यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो एंटर करा आणि मोबाईल नंबर Verify करा.

* याप्रमाणेच ई-मेल आयडीवर कोड टाकल्यानंतर तुमचा मेल आयडी व्हेरिफाय करा.

* आता तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही ट्रेनसाठी ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.

1 महिन्यात 24 तिकिटे बुक करता येणार

रेल्वेने IRCTC च्या एका यूजर आयडीवर एका महिन्यात जास्तीत जास्त तिकिटे बुक करण्याची मर्यादा 12 वरून 24 केली आहे. जर तुमचे आधार कार्ड आधार कार्ड (Aadhar Card) लिंक यूजर आयडी असेल, तर आता तुम्ही एका महिन्यात 24 तिकिटं बुक करू शकता. त्याचप्रमाणे आधार UID लिंक नसलेल्या खात्यातून 6 ऐवजी 12 तिकिटे बुक करता येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT