IRCTC  Dainik Gomantak
अर्थविश्व

IRCTC Tour Packages: IRCTC ने आणले अयोध्या दर्शनासाठी खास टूर पॅकेज, वाचा एका क्लिकवर

या अप्रतिम टूर पॅकेजची अधिक माहिती जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक

IRCTC Ayodhya Tour Package: आयआरसीटीसी (IRCTC) नेहमीच एकापेक्षा एक अप्रतिम टूर पॅकेज घेऊन येत असते. हनिमून ट्रिप किंवा धर्मयात्रा या सर्वांचे टूर पॅकेज वेगवेगळे आणि उत्तम असतात.

सध्या त्यांच्या लेटेस्ट पॅकेजेसबद्दल बोलायचे तर ते अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीसाठी आहेत. या टूरमध्ये प्रवाशांना थर्ड एसी तिकीट, डिलक्स हॉटेलमध्ये तीन रात्री मुक्काम, प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी वाहने आणि नाश्त्यासह रात्रीचे जेवण दिले जाणार आहे.चला तर मग या टूर पॅकेजबद्दल अधिक माहीती जाणून घेउया.

  • पॅकेजची माहिती

पॅकेजचे नाव - वाराणसी प्रयागराज अयोध्या टूर

कव्हर केलेले डेस्टिनेशन - वाराणसी, प्रयागराज, अयोध्या

ट्रॅव्हल मोड - ट्रेन

स्टेशन - इंदूर

कालावधी - 05 रात्री आणि 06 दिवस

टूर डेट - दर बुधवारी

मील प्लॅन - नाश्ता आणि रात्रीचे जेवण

  • काय आहे पॅकेज

- हे टूर इंदूर रेल्वे स्थानकापासून सुरू होणार आहे. इंदूर रेल्वे स्थानकातून प्रवासी महाकाल एक्स्प्रेसने वाराणसीला पोहोचतील.

- दुसऱ्या दिवशी वाराणसीतील हॉटेलमध्ये (Hotel) विश्रांती घेतील आणि नंतर सारनाथ आणि काशी विश्वनाथ मंदिराकडे यात्रेसाठी जातील.

- त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रयागराजला जाईल. प्रयागराजमध्ये यात्रेकरूंना संगम येथील हनुमान गढी येथे नेले जाईल.

- त्याच्या दुसऱ्या दिवशी राम जन्मभूमी अयोध्येत पोहोचतील. रात्रभर अयोध्येत मुक्काम करेल आणि नंतर दुसऱ्या दिवशी प्रयागराज रेल्वे (Railway) स्थानकावरून नाश्ता करून इंदूरला परत येईल.

  • या पॅकेजची किंमत

या पॅकेजमध्ये अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीचे दर्शन घेता येणार आहे. या पॅकेजसाठी प्रवाशांना वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 2 ते 3 प्रवाशांच्या ग्रुपला ट्विन शेअरिंगमध्ये 18,400 रुपये, ट्रिपल शेअरिंगमध्ये 15,100 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, मुलांसाठी एका बेडसाठी 11,900 रुपये आणि बेडशिवाय 10,750 रुपये शुल्क आकारले जाते.

याशिवाय आणखी एक पॅकेज आहे. ज्यामध्ये ग्रुप साइज 4 ते 5 प्रवाशांचा असेल. त्यात, ट्विन शेअरिंगमध्ये 15,300 रुपये, ट्रिपल शेअरिंगमध्ये 13,650 रुपये द्यावे लागतील. तर लहान मुलांसाठी बेडसाठी 10,450 रुपये आणि बेडशिवाय 9300 रुपये शुल्क आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT