iPhone 18 Pro luxury edition Dainik Gomantak
अर्थविश्व

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

iPhone 18 Pro Caviar Contrast Edition: अ‍ॅपलने नुकतेच लाँच केलेले आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स आधीच आपल्या प्रीमियम किमतीमुळे चर्चेत आहेत.

Manish Jadhav

Expensive iPhone 18 Pro edition: अ‍ॅपलने नुकतेच लाँच केलेले आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स आधीच आपल्या प्रीमियम किमतीमुळे चर्चेत आहेत. मात्र, हा महागडा फोन आणखी खास आणि अलिशान बनवण्यासाठी रशियन लक्झरी कस्टमायझेशन ब्रँड कॅविअरने नवीन 'कॉन्ट्रास्ट एडिशन' बाजारात आणले.

या लक्झरी फोनची सुरुवातीची किंमत सुमारे 6.84 लाख रुपये ठेवण्यात आली. अ‍ॅपलची 50 वी आणि कॅविअर ब्रँडची 15 वी एनिवर्सरी साजरी करण्यासाठी हे कस्टमायझेशन सादर करण्यात आले असून या खास एडिशनमध्ये टायटेनियम, फोर्ज्ड कार्बन फायबर आणि 24 कॅरेट सोन्यासारख्या मौल्यवान घटकांचा वापर करण्यात आला.

कॅविअरने या कलेक्शनमध्ये एकूण 5 वेगवेगळे डिझाईन्स सादर केले असून अत्यंत exclusive ठेवण्यासाठी प्रत्येक डिझाईनचे फक्त 50 युनिट्सच बनवले जाणार आहेत. यातील 'टायटेनियम ग्रे' मॉडेलमध्ये ब्लॅक टायटेनियम आणि डायरेक्शनल ब्रश फिनिशचा वापर केला गेला असून याची किंमत 6.84 लाख रुपयांपासून सुरु होते.

तर 'ब्लॅक मून' डिझाईनमध्ये सिल्व्हर टायटेनियम आणि पीव्हीडी-कोटेड अ‍ॅपल लोगो देण्यात आला. ज्यांना कार्बन फायबर आवडते त्यांच्यासाठी 'स्काय ब्लू' मॉडेल सादर केले, ज्यामध्ये लाईट ब्लू बॉडीसोबत हाताने तयार केलेले डार्क फोर्ज्ड कार्बन फायबर पॅनेल लावण्यात आले.

या सर्व कलेक्शनमधील सर्वात महागडे आणि आकर्षक मॉडेल 'डार्क रेड' मानले जात आहे. यामध्ये बर्गंडी बॉडीसोबत पर्पल वेनिंग असणारे कार्बन फायबर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अ‍ॅपलचा (Apple) आयकॉनिक लोगो 24 कॅरेट शुद्ध सोन्याने तयार करण्यात आला. या डार्क रेड मॉडेलची सुरुवातीची किंमत सुमारे 7.11 लाख रुपये आहे.

कॅविअरने या फोनचे बाहेरील डिझाईन आणि लुक पूर्णपणे बदलले असले तरी, फोनच्या हार्डवेअरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, कॅमेरा, प्रोसेसर, डिस्प्ले आणि बॅटरीची कार्यक्षमता मूळ आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्ससारखीच राहील. ग्राहक केवळ याच्या कस्टम डिझाईन, प्रीमियम मटेरियल, लक्झरी पॅकेजिंग आणि लिमिटेड एडिशनसाठी एवढी मोठी रक्कम मोजत आहेत. हे सर्व मॉडेल्स कॅविअरच्या अधिकृत वेबसाईटवरुन बुक केले जाऊ शकतात, जे केवळ जगातील निवडक आणि लक्झरी शौकीन लोकांसाठीच तयार केले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amazon Saleमध्ये iPhone 16 वर मोठी बचत; 18 हजारांपर्यंत स्वस्त मिळणार Appleचा फोन, ऑफरचा 'असा' घ्या फायदा

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप-10 मध्ये 4 खेळाडू, केएल राहुलची मोठी झेप

FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

Goa Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

SCROLL FOR NEXT