IOCL Recruitment 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

IOCL Recruitment 2022: इंडियन ऑइलमध्ये 1,747 पदासाठी भरती, शिक्षण फक्त दहावी पास; आजच करा अर्ज

Pramod Yadav

Indian Oil: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये शिकाऊ पदासाठी जागा रिक्त आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अप्रेंटिससाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकता.

(IOCL Recruitment for 1,747 trainee Posts)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL Recruitment) भरती मोहिमेद्वारे 1,747 शिकाऊ उमेदवारांना संधी दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील विविध राज्यांमध्ये स्थापन झालेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या विविध शाखांमध्ये संधी मिळेल. शिकाऊ पदासाठी भरती प्रक्रियेत सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना 3 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये शिकाऊ पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाचे हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कंपनीने या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित केली आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत, शिकाऊ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन शिकाऊ पदाच्या भरतीसाठी संगणक आधारित CBT परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी (Online Test) गुणांच्या आधारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉइस प्रश्न (MCQ) विचारले जातील. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना शिकाऊ पदाची पात्रता पूर्ण करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT