BSE Sensex Market Cap Dainik Gomantak
अर्थविश्व

गुंतवणूकदारांची चांदी! चार दिवसात कमावले 6.88 लाख कोटी; BSE चे मार्केट कॅप 373 लाख कोटींवर पोहोचले

BSE Sensex Market Cap: नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजेच 2024 मध्ये गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठी कमाई केली.

Manish Jadhav

BSE Sensex Market Cap: नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजेच 2024 मध्ये गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठी कमाई केली. गुंतवणूकदारांनी अवघ्या चार दिवसांत बाजारातून 6.88 लाख कोटी रुपये कमावले. यामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 373 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. शुक्रवार, 12 जानेवारी रोजी सेन्सेक्स 847 अंकांच्या वाढीसह 72,568 वर बंद झाला.

आयटी निर्देशांकात प्रचंड वाढ

दरम्यान, शुक्रवारी (12 जानेवारी रोजी) TCS आणि Infosys चे निकाल सकारात्मक होते, ज्यामुळे IT निर्देशांकात प्रचंड वाढ झाली. इन्फोसिस 7.93 टक्क्यांनी, तर टाटा समूहाची कंपनी टीसीएसमध्ये 3.94 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. याशिवाय टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो या कंपन्यांच्या समभागांमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली. यामुळे बीएसईचे मार्केट कॅप 3,73,29,676.27 कोटी रुपयांवर पोहोचले.

बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपही वधारले

आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या सकारात्मक निकालाने शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही चांगली कामगिरी केली. या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. यासोबतच शेअर बाजारानेही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. या आठवड्यात बीएसईवर एकूण 2,112 शेअर्स वाढले, तर 1742 घसरले. याशिवाय, 88 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. बीएसई स्मॉलकॅप 0.41 टक्के आणि मिडकॅप 0.36 टक्क्यांनी वधारले.

सेन्सेक्स आणि निफ्टीनेही विक्रमी उच्चांक गाठला

शुक्रवारी (12 जानेवारी रोजी) आयटी समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी वाढला, तर निफ्टीही 247 अंकांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स आता 73 हजार आणि निफ्टी 22,000 चा आकडा गाठण्याच्या अगदी जवळ आला आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​रिटेल रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका म्हणाले की, “टीसीएस आणि इन्फोसिसने त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगली वाढ नोंदवली.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT