Instagram |Twitter
Instagram |Twitter Dainik Gomantak
अर्थविश्व

Instagram: डाऊन झालेले इंस्टाग्राम पुन्हा रूटवर, ट्विटवर मजेशीर मीम्सचा पाऊस

दैनिक गोमन्तक

मेटा कंपनीची मालकी असलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामची सेवा काही वेळेसाठी डाऊन झाली होती. जगभरात अनेक देशांमध्ये गुरुवारी रात्री इंस्टाग्राम डाऊन  (Instagram Down) झाले होते. जगभरात सुमारे 24 हजार युजर्सने यासंदर्भात कंपनीकडे तक्रार केली होती.

युरोपमध्ये सर्वाधिक युजर्सकडून 'इंस्टाग्राम डाऊन' च्या तक्रारी मिळाल्या. तर भारतातसुध्दा अनेक युजर्सना या समस्येचा सामना करावा लागला. इंस्टाग्रामचा सर्व्हर डाऊन झाल्याने युजर्सनी दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ट्विटवर #instagramdown ट्रेंडिंग होत आहे. इंस्टाग्रामने अधिकृत अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली होती.

इंस्टाग्राम अर्धा तास डाऊन होते

डाउनडेक्टरच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री इंस्टाग्राम डाऊन झाले होते. डाउनडेक्टर एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जिथे युजर्सना वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि त्यांच्या सेवांबद्दल माहिती मिळते. इंस्टाग्राम आउटेजमध्ये 66 टक्के युजर्सचं अॅप क्रॅश झाल्याची नोंद होती. 24 टक्के लोकांना सर्व्हर कनेक्शनमध्ये अडचण येत होती. तर इतर 10 टक्के युजर्सला लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. काही युजर्सना इंस्टाग्रामवर फीड लोड होत नव्हते,तर काहीना मॅसेज पाठवता येत नव्हते, स्टोरी किंवा फोटो पोस्ट करता येत नव्हते. 

ट्विटरवर मीम्सचा पाऊस

इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर युजर्सनी इतर सोशल मीडिया साईटवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाहायला मिळाला, तर #instagramdown हे ट्रेंड होत आहे. ट्विटवर युजर्सनी भन्नाट मीम्स व्हायरल केल्या.

इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत

जगभरात इंस्टाग्राम डाऊन झाले होते. युरोपमध्ये याचा सर्वाधिक फटका बसला. भारतातही लोकांना इंस्टाग्राम लोड करतांना अडचण येत होती. पण यामागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. इंस्टाग्रामची मालकी असलेल्या META कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण लवकरच इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT