Finance Minister Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

लोकसभेत सोमवारी होणार Inflation वर चर्चा, अर्थमंत्री देणार उत्तर

Finance Minister Nirmala Sitharaman: लोकसभेत सोमवारी महागाईवर चर्चा होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Finance Minister Nirmala Sitharaman: लोकसभेत सोमवारी महागाईवर चर्चा होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या चर्चेमध्ये उत्तरे देतील. महागाईवर चर्चेची मागणी विरोधक सातत्याने करत होते. त्यामुळे दोन आठवडे संसदेत सातत्याने गदारोळ सुरु होता. सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु नव्हते.

दरम्यान, महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरुन झालेल्या गदारोळ आणि घोषणाबाजीमुळे विरोधी पक्षांच्या दीड डझनहून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

दुसरीकडे, महागाईच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत महागाईसह अन्य मुद्द्यांवर संसदेचे (Parliament) कामकाज ठप्प केले. सरकारच्या म्हणण्यानुसार, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. कांदे, खाद्यतेल, वनस्पती तूप, टोमॅटो आणि चहा यासह विविध जीवनावश्यक वस्तूंची सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर करुन सरकारने हा दावा केला आहे. सरकारने पुढे सांगितले की, 'सरकारच्या (Government) प्रयत्नांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने खाली येत आहेत.'

तसेच, 25 एप्रिलपासून पाम तेलाच्या किमती 10 टक्क्यांनी कमी झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. 25 एप्रिल रोजी पामतेलाची किंमत 154 रुपये प्रति लिटर होती, जी आता 25 जुलै रोजी 138 रुपयांवर आली आहे. या क्रमाने सोयाबीन तेल 165 रुपये (25 एप्रिल रोजी) वरुन 160 रुपये (25 जुलै रोजी) पर्यंत खाली आले आहे. सूर्यफूल तेल 188 रुपये (25 एप्रिल) वरुन 183 रुपये (25 जुलै), मोहरीचे तेल 184 रुपये (25 एप्रिल) वरुन 174 रुपये (25 जुलै), वनस्पती तूप 159 रुपये (25 जुलै) (25 एप्रिल भाव ) 157 रुपये (25 जुलै किंमत) पर्यंत खाली आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT